मुंबई
राज्यात बहुतांश भागात जोरदार पाऊस हजेरी लावणार आहे. राज्यात मोसमी पाऊस वेगाने सक्रिय झाला आहे. त्यामुळे हवामान विभागाने राज्यात पुढील दोन ते तीन दिवस जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. तर राज्यातील बहुतांश भागात रेड अलर्ट, ऑरेंज अलर्ट तर यलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे व योग्य गी काळजी घेण्याचं आवाहन हवामान विभागाने केलं आहे.
🔴 रेड अलर्ट : पुणे, सातारा
🟠 ऑरेंज अलर्ट : पालघर, जळगाव, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नंदुरबार, नाशिक
🟡 यलो अलर्ट : धुळे अहमदनगर, नंदुरबार, जळगाव, अकोला, अमरावती, भंडारा, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ
राज्यात 27 ऑगस्टपर्यंत पाऊस पडणार आहे. हा पाऊस संपूर्ण राज्यात असणार आहे. मात्र काही जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाण जास्त राहणार आहे. कोकण, अहमदनगर, बीड, वैजापूर, पैठण, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांमध्ये या काळात पावसाचे प्रमाण जास्त राहील. मात्र 28 तारखेपासून राज्याच्या हवामानात बदल होणार आहे.
28 आणि 29 तारखेला महाराष्ट्रातील हवामान प्रामुख्याने कोरडे राहील असा अंदाज आहे. पण यानंतर पुन्हा एकदा पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होणार आहे. बैलपोळ्याच्या दिवशी म्हणजेच 2 सप्टेंबरला महाराष्ट्रात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय होईल.