दीपावली गर्दी नियंत्रणासाठी रेल्वेच्या प्रभावी उपाययोजना कार्यान्वित

नाशिक परिसरात प्रसारित चुकीच्या बातम्यांबाबत स्पष्टीकरण

0

 

लोकशाही न्यूज नेटवर्क

काही माध्यमे तसेच सोशल मीडियावर नाशिक स्थानकावर झालेल्या कथित घटनेचे दिशाभूल करणारे व अप्रमाणित व्हिडिओ प्रसारित केले जात आहेत. मध्य रेल्वे स्पष्ट करते की प्रसारित केलेले कोणतेही फुटेज नाशिकमधील नाही. या सर्व बातम्या आधारहीन असून कोणतीही विश्वसनीय माहिती त्यात नाही. या संदर्भात अधिकृत स्पष्टीकरण मध्य रेल्वेच्या “X” (पूर्वी ट्विटर) या अधिकृत प्लॅटफॉर्मवरून देण्यात आले आहे. सध्या नाशिक स्थानकावरील प्रवासी वाहतूक पूर्णपणे सुरळीत आहे. दीपावलीच्या पार्श्वभूमीवर प्रवासी गर्दी नियंत्रणासाठी रेल्वे प्रशासनाने सर्वंकष व काटेकोर योजना अमलात आणली आहे.

 

प्रमुख उपाययोजना खालीलप्रमाणे आहेत :

१. गर्दी नियंत्रण व देखरेख:

गाड्यांमध्ये तिकीट तपासणी मोहीमा तीव्र करण्यात आल्या आहेत.

स्थानकांवर अतिरिक्त व्यावसायिक व रेल्वे सुरक्षा बल (RPF) कर्मचारी तैनात करून गर्दी नियंत्रणाची व्यवस्था मजबूत करण्यात आली आहे.

सर्व प्लॅटफॉर्मवर सीसीटीव्हीच्या माध्यमातून २४ तास देखरेख ठेवली जात आहे.

प्लॅटफॉर्म तिकीट विक्री तात्पुरती बंद करण्यात आली आहे (वृद्ध नागरिक व दिव्यांग प्रवाशांच्या नातेवाईकांसाठी मर्यादित अपवाद).

विभागीय मुख्यालयात “वार रूम” २४x७ कार्यरत असून प्रवासी हालचालींचे सतत निरीक्षण केले जात आहे.

२. तात्काळ प्रतिसाद प्रणाली:

वार रूममध्ये प्राप्त तक्रारी किंवा सूचना तत्काळ प्राधान्याने हाताळल्या जातात. नियुक्त अधिकारी स्थानक आणि नियंत्रण कक्षात तैनात आहेत, जे आवश्यकतेनुसार त्वरीत कार्यवाही करतात.

३. प्रवासी सुविधा:

नाशिक स्थानकावरील होल्डिंग एरिया पूर्णपणे कार्यान्वित असून प्रवाशांच्या प्रवाहाचे नियमन प्रभावीपणे केले जात आहे.

४. गाड्यांचे हाताळणी नियोजन:

सर्व गाड्या त्यांच्या निश्चित प्लॅटफॉर्मवरच घेतल्या जात आहेत, प्रवाशांच्या सोयीसाठी शेवटच्या क्षणी प्लॅटफॉर्म बदल टाळले जात आहेत.

५. प्रतिबंधात्मक व सुरक्षात्मक उपाय:

  1. a) सातत्यपूर्ण समुपदेशन: सर्व लोको पायलट (LP) व सहाय्यक लोको पायलट (ALP) यांना २४ तास समुपदेशन देण्यासाठी क्रू लॉबी निरीक्षक (CLI) नियुक्त करण्यात आले आहेत. समुपदेशनामध्ये गाडी चालवताना प्लॅटफॉर्मवर प्रवाशांना पुरेसा वेळ देणे, स्टेशन स्कीप करताना व प्लॅटफॉर्मवर सतत शिट्टी देणे यावर विशेष भर दिला जात आहे.
  2. b) “शिट्टी वाजवा” जागरूकता: सर्व लोको पायलट व ALP यांना गर्दीच्या ठिकाणी शिट्टी वाजवण्याचे निर्देश दिले आहेत, जेणेकरून प्रवाशांना सतर्कता राहील.
  3. c) प्रदर्शन फलक: सर्व क्रू लॉबींमध्ये “Whistle Freely / शिट्टी वाजवा” असे फलक लावण्यात आले आहेत.
  4. d) FSD ऑडिओ स्मरण: Fog Safe Device (FSD) मध्ये “कृपया शिट्टी वाजवा” असा ऑडिओ अलर्ट समाविष्ट करण्यात आला आहे.

६. अभियांत्रिकी दक्षता:

अभियांत्रिकी कर्मचारी विभागांदरम्यान गस्त घालत असून ट्रॅक पार करणाऱ्या व्यक्तींना शिट्टी देऊन सतर्क केले जात आहे, जेणेकरून कोणताही अपघात टाळता येईल.

मध्य रेल्वे सर्वसामान्य नागरिक व माध्यमांना विनंती करते की अप्रमाणित किंवा चुकीची माहिती प्रसारित करू नये आणि केवळ अधिकृत स्रोतांवरून प्राप्त माहितीवरच विश्वास ठेवावा.

Leave A Reply

Your email address will not be published.