सावधान.. दुसऱ्यांचं तिकीट काढला तर थेट तुरुंगात जाल

काय आहे नवीन नियम 

0

नवी दिल्ली, लोकशाही न्युज नेटवर्क 

 

रेल्वेचे तिकीट काढतांना भल्या रांगेत उभं राहायचं कंटाळा येतो तसेच वेळ देखील जातो म्हणून आता सर्व जण ऑनलाईन तिकीट काढायला प्राधान्य देतात. आता तिकीट बुक करण्याबाबत रेल्वे प्रशासनाने नवीन नियम बनवले आहेत.

ज्यात तिकीट आरक्षण प्रक्रियेमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी काही महत्त्वाचे बदल केले आहेत. या नवा नियमानुसार जर तुम्ही तुमच्या अकाऊंटमरून दुसऱ्याचे तिकीट बुक केले तर, तिकीट काढणाऱ्यांला थेट तुरुंगात जावं लागणार आहे. रेल्वे कायद्यातील अनुच्छेद 143 नुसार फक्त अधिकृत परवानगी असणाऱ्या एजंटनाच त्रयस्त व्यक्तींसाठी रेल्वे तिकीटांचं आरक्षण करता येणार आहे.

आतापर्यंत अनेकदा IRCTC Account च्या माध्यमातून लोक मित्रमंडळी किंवा ओळखीतील एखाद्या व्यक्तीला तिकीट काढून देत होते. ही मदत महागात पडू शकते. दुसऱ्यांसाठी रेल्वे तिकीट काढणे हे कृत्य गुन्ह्यास पात्र असून, असं करणाऱ्यांवर रेल्वे प्रशासनाकडून कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. अधिकृत परवानगी असणाऱ्या एजंटनाच इतर व्यक्तींसाठी रेल्वे तिकीटांचं आरक्षण करता येणार आहे. या नियामांचं उल्लंघन करणाऱ्याला 3 वर्षांचा कारावास आणि 10,000 रुपयांचा दंड अशी शिक्षा ठोठावण्यात येणार आहे.

रेल्वेच्या नव्या नियमानुसार कोणीही व्यक्ती फक्त त्यांचं रक्ताचं नातं असणाऱ्यांसाठीच तिकीट बुक करु शकतो. म्हणजेच तिकीट बुक करणारा आणि प्रवास करणाऱ्या व्यक्तींचं आडनाव एकसारखं असणं गरजेचं आहे. त्यामुळे मित्रमंडळी किंवा ओळखीच्या एखाद्या व्यक्तीसाठी तुम्ही तिकीट बुक करू शकत नाही. असे केल्यास ते महागात पडू शकते. तिकीट आरक्षणामध्ये सूसुत्रता आणण्यासाठी आणि कोणताही गैरप्रकार टाळण्यासाठी हे नियम आखण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.