Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • शनिपेठ पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांच्या बदलीने प्रश्न सुटेल का?
    • दलित, ओबीसींना हिंदू म्हणते अन् अधिकारापासून रोखते!
    • उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे दिल्लीत एकाच ताटात खातात!
    • ओळख लपविण्यासाठी बुरखा घालून घरी नेत अत्याचार
    • राज्यात उष्णतेची लाट; प्रशासनाकडून सतर्कतेचे आवाहन
    • माणसाने झेपेल तितकेच बोलावे!
    • बिबट्याच्या कातडीसह पाच तस्कर गजाआड!
    • किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहीका आजारी
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»राजकारण»काँग्रेस नेते पवन खेरा यांच्या घरावर छापेमारी
    राजकारण

    काँग्रेस नेते पवन खेरा यांच्या घरावर छापेमारी

    विधानसभा निवडणुकीआधी मोठी कारवाई
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveApril 7, 2026No Comments217 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    आसाम विधानसभा निवडणुकीसाठी ९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. त्याआधीच झालेल्या कारवाईमुळं राजकीय भूकंप झाला आहे. आसाम पोलिसांच्या एका पथकानं आज, ७ एप्रिल रोजी दिल्ली पोलिसांच्या मदतीने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पवन खेरा यांच्या दिल्लीमधील निजामुद्दीन ईस्ट निवासस्थानी छापेमारी केली. आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांच्या पत्नी रिंकी भुइयां सरमा यांनी त्यांच्याविरोधात दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या पत्नीकडे तीन देशांचे पासपोर्ट आणि विदेशात बेहिशेबी संपत्ती असल्याचा आरोप पवन खेरा यांनी केला होता.

    सूत्रांच्या माहितीनुसार, पवन खेरा यांची चौकशी करण्यासाठी आणि महत्वाची कागदपत्रे जप्त करण्यासाठी आसाम पोलिसांचे पथक त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी पोहोचले होते. काही रिपोर्ट्सनुसार, पोलिसांचे पथक खेरा यांना अटक करण्यासाठी गेले होते. मात्र, खेरा त्यावेळी घरी नव्हते. त्यामुळे केवळ झाडाझडती घेतल्याचे सांगण्यात येत आहे.

    हिमंत बिस्वा सरमा यांच्या पत्नीकडे इजिप्त, संयुक्त अरब अमिरात (UAE) आणि एंटिगुआ अँड बारबुडा या तीन वेगवेगळ्या देशांचे पासपोर्ट आहेत. तसेच दुबईत मालमत्ता, अमेरिकेत लाखो-कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक असल्याचा आरोप पवन खेरा यांनी केला होता. यासंबंधित कागदपत्रे विश्वसनीय आंतरराष्ट्रीय सूत्रांकडून प्राप्त झाल्याचा दावा खेरा यांनी केला होता. काँग्रेस लवकरच याबाबतचे पुरावे सादर करणार आहे, असंही त्यांनी म्हटलं होतं. खेरा यांच्या आरोपांमुळं विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आसाममधील राजकारण तापलं होतं.

    काँग्रेस नेते पवन खेरा यांच्या घरावरील छापेमारीबाबत आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिसवा सरमा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. खेरा हे काल गुवाहाटी येथून पसार झाले आहेत. पोलीस त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी पोहचले होते, अशी माहिती मला मीडियाच्या माध्यमातून मिळाली. पण ते हैदराबादला पळून गेल्याचे समजले. कायदा आपले काम करणार आहे, असेही मुख्यमंत्री सरमा म्हणाले.

    गुवाहाटीत पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री सरमा यांनी हा दावा केला आहे. यावेळी सरमा यांनी काँग्रेस नेते पवन खेरा यांच्याविरोधात कठोर पाऊल उचलण्यात येईल, अशी शपथच घेतली. मी पवन खेरा यांच्याविरोधात कठोर कारवाई करणार आहे. थोडे दिवस वाट बघा, असे सांगतानाच, आम्ही आगामी विधानसभा निवडणुकीत किमान १०० जागा जिंकू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    दलित, ओबीसींना हिंदू म्हणते अन् अधिकारापासून रोखते!

    April 17, 2026

    उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे दिल्लीत एकाच ताटात खातात!

    April 17, 2026

    माणसाने झेपेल तितकेच बोलावे!

    April 17, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.