Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमास वेग
    • महामार्गावर तीन नव्हे, चार उड्डाणपूल हवेत!
    • गुटखा, पान मसाला आणि इतर प्रतिबंधित उत्पादनांवर बंदी
    • मुंबई पोलीस दलाची प्रतिमा काळवंडली
    • दूध संघात उद्या प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचे उद्घाटन
    • वंदे मातरम्‌‍ला राष्ट्रगीताप्रमाणेच कायदेशीर संरक्षण!
    • भाविकांच्या गाडीला अपघात : १२ जण जखमी
    • मराठी येत नसल्यास चालकाचे लायसन्स होणार रद्द!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»कोयना गेटजवळ अवैध मद्यपान अड्ड्यावर धाड
    गुन्हे वार्ता

    कोयना गेटजवळ अवैध मद्यपान अड्ड्यावर धाड

    ग्राहकांसह अड्डा चालकाविरुद्ध गुन्हा; मुद्देमाल जप्त
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJune 23, 2026No Comments123 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    चंद्रपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क

    अवैध मद्यविक्री आणि मद्यपान अड्ड्यांविरोधातील मोहिमेला गती देत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वरोरा पथकाने शनिवारी ताडोबा रोडवरील कोयना गेट परिसरात धडक कारवाई केली. रस्त्याच्या कडेला उभारलेल्या अस्थायी टिनाच्या झोपडीत सुरू असलेल्या अवैध मद्यविक्री व मद्यपान अड्ड्यावर टाकलेल्या या धाडीत ग्राहकांसह अड्डा चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून 21 हजार 950 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

    तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. कारवाईदरम्यान सदर ठिकाणी कोणतीही वैध परवानगी नसताना मद्यविक्री सुरू असल्याचे तसेच ग्राहकांना मद्यपानासाठी आवश्यक साहित्य व सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असल्याचे निदर्शनास आले.

    प्रसंगी धाडीत मुकेश मधुकर रामटेके, विकास विठोबा किरमीरे, राजेश चंद्रकांत वाघ आणि अंबादास नानाजी थेरे हे चौघे ग्राहक प्रत्यक्ष मद्यपान करताना आढळून आले. तसेच आशिष नत्थुजी खोब्रागडे हा ग्राहकांना मद्यपानासाठी आवश्यक सुविधा पुरवित असल्याचे निष्पन्न झाले.

    याप्रकरणी संबंधितांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 च्या कलम 65, 68 व 84 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या सर्व ग्राहकांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून अहवालात त्यांनी मद्यप्राशन केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे संबंधितांविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.

    या कारवाईत 200 सीलबंद देशी दारूच्या बाटल्या, विविध प्रकारच्या व्हिस्कीच्या 29 बाटल्या असा 15 हजार 270 रुपयांचा मद्यसाठा, काउंटरवरील 2 हजार 750 रुपयांची रोख रक्कम तसेच इतर साहित्य जप्त करण्यात आले. एकूण जप्त मुद्देमालाची किंमत 21 हजार 950 रुपये असल्याची माहिती विभागाने दिली.

    ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाचे निरीक्षक दत्तात्रय वरठी यांचे नेतृत्वात दुय्यम निरीक्षक प्रमोद राजोते, सचिन पोलेवार, सोमेश्वर गव्हारे तसेच जवान जगदीश मस्के, अमोल भोयर, रामचंद्र अम्मावार, संजयकुमार हरीनखेडे, सुजित चिकाटे, महिला जवान सुकेशनी कारेकर आणि विलास महाकुलकर यांनी केली.

    नागरिकांना आवाहन

    परिसरात अवैध दारू विक्री, मद्यपान अड्डे अथवा सार्वजनिक ठिकाणी मद्यपान सुरू असल्याची माहिती मिळाल्यास नागरिकांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या टोल फ्री क्रमांक 18002339999 किंवा व्हॉट्सअॅप क्रमांक 8422001133 वर त्वरित माहिती द्यावी. माहिती देणाऱ्याची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येईल, असे अधीक्षक नितीन धार्मिक यांनी सांगितले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमास वेग

    August 12, 2026

    मुंबई पोलीस दलाची प्रतिमा काळवंडली

    August 12, 2026

    दूध संघात उद्या प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचे उद्घाटन

    August 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif