Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • पारडी येथे “आदिवासी सल्ला शक्ती स्थापना दिन” उत्साहात
    • भुसावळच्या प्रभारी नगराध्यक्ष शैलजा नारखेडे यांचे अभिनंदन!
    • खालसा हेल्प फाउंडेशनची कार्यकारिणी जाहीर
    • पुढील 3 दिवसात विक्रमी तापमानाची नोंद होणार
    • आरटीआय कार्यकर्त्याची भरदिवसा ठेचून हत्या
    • लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात
    • तीन लहान मुलांनी आरोपीला रोखण्याचा केला होता प्रयत्न
    • सूर्यनारायण कोपला.. काळजी घ्या..!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»तळेगाव येथे जुगार अड्ड्यावर छापा; 4.21 लाखांचा मुद्देमाल जप्त
    गुन्हे वार्ता

    तळेगाव येथे जुगार अड्ड्यावर छापा; 4.21 लाखांचा मुद्देमाल जप्त

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveApril 14, 2026No Comments140 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चाळीसगाव : चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पथकाने तळेगाव येथे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून 9 जणांना ताब्यात घेतले असून एकूण 4 लाख 21 हजार 430 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
    पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. 11 एप्रिल रोजी सायंकाळी सुमारे 5.35 वाजण्याच्या सुमारास तळेगाव येथील मराठी शाळेजवळील मोकळ्या जागेत काही इसम पत्त्यांवर जुगार खेळत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांना मिळाली. त्यानुसार पोलीस पथकाने तत्काळ घटनास्थळी छापा टाकला. या कारवाईत विजय देवरे, प्रविण देवरे, बापू नाईकुडे, एकनाथ राठोड, छोटुलाल पाटील, अमोल गोरे, प्रदीप म्हस्के, हेमेन्द्र पाटील व नाना पाटील या नऊ जणांना जागीच पकडण्यात आले. तसेच हा जुगार अड्डा तुषार देशमुख (रा. तळेगाव) चालवत असल्याचे निष्पन्न झाले आहे. छाप्यात आरोपींकडून रोख रक्कम 69,230 रुपये, विविध कंपनीचे मोबाईल फोन सुमारे 50 हजार रुपये किंमतीचे, तसेच सुमारे 3 लाख रुपये किंमतीच्या मोटारसायकली, जुगारासाठी वापरले जाणारे साहित्य आणि इतर वस्तू असा एकूण 4,21,430 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी सर्व आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम 4, 5 व 12 (अ) अन्वये चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    आरटीआय कार्यकर्त्याची भरदिवसा ठेचून हत्या

    May 13, 2026

    लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात

    May 13, 2026

    तीन लहान मुलांनी आरोपीला रोखण्याचा केला होता प्रयत्न

    May 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif