Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • शिवसेना ठाकरेंची की शिंदेंची? निकाल अंतिम टप्प्यात!
    • हे आंदोलन म्हणजे नौटंकी आहे : लक्ष्मण हाकेंचा आरोप
    • बिबट्या दिवसाढवळ्या थेट अंगावर आला धावून
    • चक्क शिंदेसेनेच्या नगरसिवेकेवर गुन्हा दाखल
    • मनोज जरांगे पाटलांना पोलिसांची नोटीस
    • गणेशोत्सवाच्या धामधुमीत किरकोळ वादातून गोळीबार!
    • बापरे! 40 विद्यार्थ्यांची बस सुपे घाटात उलटली!
    • जरांगे पाटलांचा मोर्चा मुंबईकडे निघाला!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»हनुमान टेकडीवरील जुगार अड्ड्यावर छापा; मुद्देमाल जप्त
    गुन्हे वार्ता

    हनुमान टेकडीवरील जुगार अड्ड्यावर छापा; मुद्देमाल जप्त

    सहा जणांवर गुन्हा दाखल, रोकड, मोबाईलसह पाच दुचाकी पोलिसांच्या ताब्यात
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveAugust 20, 2026No Comments27 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    नागभीड, लोकशाही न्यूज नेटवर्क

    मौजा कान्पा येथील हनुमान टेकडी परिसरात सुरू असलेल्या ५२ पानी जुगार अड्ड्यावर नागभीड पोलिसांनी धाड टाकत अवैध जुगाराचा पर्दाफाश केला. दि. १५ ऑगस्ट २०२६ रोजी करण्यात आलेल्या या कारवाईत सहा जणांवर महाराष्ट्र जुगारबंदी अधिनियमान्वये कारवाई करण्यात आली असून, ३ लाख ७७ हजार ९१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

    याशिवाय कान्पा येथील टेकडीवरील हनुमान मंदिर परिसरात ५२ पानी जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती नागभीड पोलिसांना मिळाली होती. या माहितीची खातरजमा करून पोलिस पथकाने परिसरात धाड टाकली. यावेळी पैशांची बाजी लावून हार-जीतीचा जुगार खेळताना सहा जण पोलिसांच्या हाती लागले.

    कारवाईत दिपक गंगाधर करुटकर (३७), लक्ष्मण नेमाजी गोंगल (३५), जगदिश दादाजी भुरसे (४९), सुधाकर पांडुरंग मुळे (४७), दामोदर वासुदेव घ्यार (६६) आणि नितेश बाळकृष्ण मलोडे (३०) यांच्यावर कारवाई करण्यात आली.

    प्रसंगी पोलिसांनी जुगाराच्या डावावरील ९०० रुपये, आरोपी क्र. १ ते ५ यांच्या अंगझडतीतील ६ हजार १० रुपये, घटनास्थळावरून ६ मोबाईल फोन किंमत ४१ हजार रुपये तसेच ५ मोटारसायकली किंमत ३ लाख ३० हजार रुपये, असा एकूण ३ लाख ७७ हजार ९१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

    या दरम्यान हनुमान मंदिर परिसरासारख्या ठिकाणी जुगाराचे अड्डे सुरू असल्याची माहिती मिळताच नागभीड पोलिसांनी तत्काळ कारवाई केल्याने अवैध जुगार व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. परिसरातील अवैध धंद्यांविरोधात पोलिस प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.

    सदर कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी साहील झरकर तसेच नागभीड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रमाकांत कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

    या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक अजिंक्य गोविंदलवार, पोलीस उपनिरीक्षक अनिल डोंगरवार, पोलीस हवालदार दिलीप चौधरी, पोलीस अंमलदार जितेंद्र मारबते आणि शुभम वनकर यांच्या पथकाने सहभाग घेतला. तसेच नागभीड पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे परिसरातील अवैध जुगार अड्ड्यांना चांगलाच दणका बसला असून, अशा अवैध प्रकारांविरोधात कारवाई आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    हे आंदोलन म्हणजे नौटंकी आहे : लक्ष्मण हाकेंचा आरोप

    September 16, 2026

    बिबट्या दिवसाढवळ्या थेट अंगावर आला धावून

    September 16, 2026

    चक्क शिंदेसेनेच्या नगरसिवेकेवर गुन्हा दाखल

    September 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif