Sunday, November 27, 2022

ब्रेकिंग.. राहुल गांधींना बॉम्बने उडवण्याची धमकी

- Advertisement -

इंदूर, लोकशाही न्यूज नेटवर्क

- Advertisement -

काँग्रेस (Congress) खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना बॉम्बने उडवण्याची धमकी (Bomb Threat) दिली आहे. त्यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेदरम्यान (Bharat Jodo Yatra) इंदूरमध्ये (Indore) बॉम्ब ठेवण्याची धमकी दिली आहे. यामुळे जिल्हा आणि पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

- Advertisement -

जुनी इंदोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका मिठाईच्या दुकानात हे धमकीचे पत्र सापडले आहे. सध्या पोलिस शेजारी लावलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पत्र सोडून गेलेल्या व्यक्तीचा शोध घेत आहेत.

इंदूरच्या जुनी भागात असलेल्या एका मिठाईच्या दुकानात अज्ञात व्यक्तीने पत्र टाकले होते. हा प्रकार दुकानमालकाने पाहिल्यानंतर त्यांनी हे पत्र पोलिसांच्या ताब्यात दिले. या पत्रात राहुल गांधी यांना भारत जोडो यात्रेचा भाग म्हणून इंदूरच्या खालसा कॉलेजमध्ये थांबल्यास बॉम्बने स्फोट घडवून आणण्याची धमकी देण्यात आली आहे.

डीसीपी इंटेलिजन्स रजत सकलेचा यांनी धमकीचे पत्र मिळाल्याची पुष्टी केली असून हे पत्र उज्जैनमधून आल्याचे त्यांनी सांगितले. या पत्रात एका आमदाराच्या नावाचाही उल्लेख आहे.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या