Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दिवाळी पाडवा आणि भाऊबीज : नात्यातील जिव्हाळ्याचा दीपोत्सव
    • ठाकरेंची साथ सोडण्याच्या निर्णयाबाबत निंबाळकरांचे मोठे विधान
    • 15 डिसेंबरपर्यंत शेतातील बोअरवरील बंदी उठविणार
    • कोल्हापुरात गोकुळच्या माजी संचालकांना शिवीगाळ
    • अमेरिकेत ऐन दिवाळी समारंभात गोंधळ
    • दिवाळी : दंतकथांमागील शहाणपण
    • हे पैसे तुमचे आहेत.. मोदीच्या बापाचे पैसे नाहीत!
    • दिवाळी सण उजळला, शेतकऱ्यांमध्ये मात्र अंधार!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»राष्ट्रीय»राहुल गांधी थेट बॅरिकेड्सवर चढले; पोलिसांकडून…
    राष्ट्रीय

    राहुल गांधी थेट बॅरिकेड्सवर चढले; पोलिसांकडून…

    दिल्लीत हायव्होल्टेज ड्रामा : राजकाऱण तापले
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveOctober 6, 2026Updated:October 6, 2026No Comments189 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    मतदार यादीत करण्यात आलेल्या फेरफाराचा आरोप करत ‘इंडिया’ आघाडीने आज मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात जोरदार मोर्चा उघडला. निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी करत विरोधकांनी संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयाकडे कूच केली. या आंदोलनामुळे मध्य दिल्लीतील सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली होती. आंदोलनादरम्यान राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यासह अनेक खासदारांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.

    आंदोलनादरम्यान एक थरारक दृश्य पाहायला मिळाले. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हातात तिरंगा घेऊन थेट पोलिसांच्या बॅरिकेड्सवर चढले. पोलिसांनी रस्ता अडवल्यानंतर राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी रस्त्यावरच धरणे आंदोलन सुरू केले. काही वेळातच पोलिसांनी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यासह ‘इंडिया’ आघाडीच्या अनेक खासदारांना ताब्यात घेतले. राहुल गांधींना घेऊन जाणारी पोलिसांची बस कार्यकर्त्यांच्या प्रचंड गर्दीमुळे काही काळ रस्त्यातच अडकून पडली होती.

    राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यालयात जाण्यासाठी गनिमी कावा केला. राहुल गांधी आणि काही खासदार जवळच असलेल्या आकाशवानी भवनात अचानक गेले. त्या ठिकाणाहून राहुल गांधी यांनी आयोगाच्या कार्यालयात शिरण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला आहे. दिल्लीतील राजकाऱण तापले आहे. राहुल गांधींसह विरोधीपक्षातील अनेक खासदारांनी आज मोर्चा काढलाय.

    या आंदोलनाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे आतापर्यंत तटस्थ भूमिका घेणारा नवीन पटनायक यांचा ‘बीजू जनता दल’ पक्षही या विरोधात सामील झाला. बीजेडी प्रमुख नवीन पटनायक यांनी आधीच ‘एसआयआर’ प्रकरणाला कडाडून विरोध केला होता. आज त्यांच्या पक्षाच्या खासदारांनीही या मोर्चात सहभाग घेतला.

    विरोधी पक्षाचे खासदार निवडणूक आयोगाच्या कार्यालयाकडे जात असताना, नीती आयोगाच्या इमारतीसमोर सुरक्षा दलांनी त्यांना रोखले. यावेळी खासदारांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. जोपर्यंत ज्ञानेश कुमार आपल्या पदाचा राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत हा लढा चालूच राहील, असा इशारा विरोधकांनी दिला आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    ठाकरेंची साथ सोडण्याच्या निर्णयाबाबत निंबाळकरांचे मोठे विधान

    November 8, 2026

    अमेरिकेत ऐन दिवाळी समारंभात गोंधळ

    November 8, 2026

    हे पैसे तुमचे आहेत.. मोदीच्या बापाचे पैसे नाहीत!

    November 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif