“मरण तर प्रत्येकालाच येतं, पण …;” वडिलांच्या निधनानंतर राजीव बजाज यांची भावूक पोस्ट

लोकशाही न्यूज नेटवर्क 

 

पुणे; ‘हमारा बजाज’ हे कंपनीचे ब्रीदवाक्य निश्चित करून आपल्या कार्यकर्तत्वाने ते प्रत्यक्षात उतरवून दाखविलेले द्रष्टे उद्योगपती पद्मभूषण राहुल बजाज (८३) (Rahul Bajaj) यांचे अल्पशा आजाराने पुण्यातील खासगी रुग्णालयात शनिवारी दुपारी निधन झालं.

गेल्या महिनाभरापासून कर्करोगाशी सुरू असणारा लढा अपयशी ठरला. यानंतर राहुल बजाज यांचे सुपुत्र आणि बजाज ऑटोचे (Bajaj Auto) व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज (Rajiv Bajaj) यांनी एक भावूक पोस्ट केली आहे.

त्यांनी आपल्या व्हॉट्सअॅपवर (Whatsapp) अबाऊटमध्ये एक भावूक संदेश लिहिला आहे. “मरण तर प्रत्येकालाच येतं, पण खऱ्या अर्थानं ‘जगणारी’ फार थोडी माणसं असतात,” असं त्यांनी आपल्या व्हॉट्सअॅपच्या अबाऊट स्टेटसमध्ये म्हटलं आहे.

सर्वसामान्यांची गरज ओळखली

सर्वसामान्यांच्या वाहनविषयक गरज ओळखून स्कूटरपासून ते भन्नाट स्पोर्टस् बाईक बनवून सर्वसामान्यांच्या जीवनाला बजाज यांनी गती प्राप्त करून दिली. वर्षभराचे वेटींग असायचे तरीही लोकं पैसे भरुन ‘बजाज बुक’ केली असे अभिमानाने सांगायचे.

बजाज ही केवळ कंपनी नव्हती तर सर्वसामान्यांसाठी ‘हमारा बजाज’ बनल्याचे  ते द्योतक होते. या किमयेचे राहुल बजाज हेच जादुगार होते. त्यांच्या कारकिर्दीतील ‘एम फिप्टी’ आणि ‘एम एटी’ या दोन बाईकनी तर विक्रीचा विक्रम नोंदविला होता.

‘हमारा बजाज’ची कथा

त्या काळात बजाज स्कूटरची कायनेटिक होंडा व एलएमएल व्हेस्पा या गाड्यांसोबत स्पर्धा सुरू होती. बजाजच्या स्कूटर जुनाट वाटत असल्याने नव्याने ब्रॅंडिंगची कल्पना सुचली. बजाज स्कूटर देशातील सर्व घटक वापरत असल्याने सर्वांना आपलेसे वाटेल असे चित्रण जाहिरातीत केले. त्यातून ‘हमारा बजाज’ या ओळी शब्दबद्ध झाल्या. आणि नवा इतिहास घडला. हे शब्द प्रत्येकाच्या हृदयात कोरले गेले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here