प्रा. रफिक जमील शेख राज्यस्तरीय ‘समाज भूषण’ पुरस्काराने सन्मानित

0

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क

सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट चे एमसीए विभाग प्रमुख प्रा. रफिक जमील शेख यांना नुकतेच नाशिकच्या तेजस फाउंडेशतर्फे मान्यवरांच्या हस्ते राज्यस्तरीय ‘समाज भूषण ‘ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. गौरवपत्र पत्र आणि सन्मान चिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाजातील गुणवंत व्यक्तींचा पुरस्कार देऊन तेजस फाउंडेशनतर्फे गौरव करण्यात येतो . यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ साहित्यिक, विचारवंत डॉ. ऋषिकेश कांबळे ,चित्रपट अभिनेता व दिग्दर्शक राजू मोरे , जेष्ठ साहित्यिक, नाशिक . प्रा. डॉ. बापुराव देसाई,ज्यु. भाऊ कदम अभिनेता शि. सिद्धार्थ सोनवणे, छ. संभाजीनगरचे कृषी अधिकारी नाथकुमार घोलवाड , तेजस फाउंडेशनच्या अध्यक्ष मेघा डोळस , लेखक कवी महेंद्र तुपे आदी मान्यवर उपस्थित होते. छत्रपती संभाजी नगर येथे १९ मार्च रोजी डो. बाबासाहेख आंबेडकर संशोधन केंद्र,किलेअर्क येथे झालेल्या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव यावेळी करण्यात आला.

प्रा. रफिक जमील शेख यांनी पुरस्कार मिळाल्याचे श्रेय आई माजी नायब तहसीलदार के. जे. शेख आणि जिल्हाधिकारी कार्यायालयातील सेवानिवृत्त लेखाधिकारी स्व. जे ए शेख यांना दिले आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळे हा पुरस्कार मिळाल्याचे मनोगत प्रा.जमील शेख यांनी व्यक्त केले.

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.