राधी: हृदयस्पर्शी कथेने विद्यार्थिनी गहिवरल्या.

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

डॉ.अण्णासाहेब जी.डी. बेंडाळे महिला महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीने प्रतिभावंत कथाकार जी.ए. कुलकर्णी यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने अभिवाचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. मू.जे. महाविद्यालयातील प्रा. गोपीचंद धनगर यांच्यासह दोन विद्यार्थिनींनी जी.ए. कुलकर्णी यांच्या सुप्रसिद्ध ‘राधी’ या कथेचे अभिवाचन करून उपस्थित विद्यार्थिनींचे मन गहिवरून टाकले.

साहित्यिक जी.ए. कुलकर्णी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या राधी या हृदयस्पर्शी कथेचे अभिवाचन मू. जे. महाविद्यालयातील कला साहित्य व सांस्कृतिक मंडळ समुहाने केले. सदर अभिवाचनाला महाविद्यालयातील मराठी विभागाच्या व महाविद्यालयातील विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. याप्रसंगी मराठी विभागाचे प्रमुख डॉ.सत्यजित साळवे, प्रा.दीपक पवार, प्रा.रिना पवार, प्रा.वर्षा काळे आणि प्रा.मोईन शेख उपस्थित होते.

या अभिवाचनाचे दिग्दर्शन प्रा.गोपीचंद धनगर यांनी केले आहे. अभिवाचनात उर्मिला चौधरी, सिद्धी उपासनी, प्रा.गोपीचंद धनगर यांचे सादरीकरण तर पार्श्वसंगीत प्रा.निलेश चौधरी यांचे आहे. निर्मितीप्रमुख म्हणून प्राचार्य डॉ. सं.ना भारंबे व निर्मितीव्यवस्था डॉ.योगेश महाले यांची होती.

Leave A Reply

Your email address will not be published.