Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • आदिवासी लोक संघर्ष मोर्चाला किती ताण देणार?
    • दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी तुटपुंज्या मदतीत!
    • एका धडकेत सहा जीव संपले; तीन चिमुकल्यांचाही दुर्दैवी अंत!
    • मसाल्यांतील भेसळीविरुद्ध राज्यभर कठोर कारवाईचे आदेश!
    • पाचोऱ्यात हातमजुराचा आर्थिक विवंचनेतुन गळफास
    • अदानी-अंबानींचे २० लाख कोटी रुपयांचे कर्जमाफी मग..
    • एसटी तोट्यात, तरी भाडेवाढीचा भार टाकणार नाही!
    • वाचनातून व्यक्तिमत्व सर्जनशील होते : चंद्रकांत चव्हाण
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»ताज्या बातम्या»महापालिका शाळांमधील खिचडी वाटपावर प्रश्नचिन्ह?
    ताज्या बातम्या

    महापालिका शाळांमधील खिचडी वाटपावर प्रश्नचिन्ह?

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveOctober 2, 2026No Comments67 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    महिला बचत गटांच्या कामांवर स्थायी समिती असमाधानी : अध्यक्षांसह नगरसेवकांनी व्यक्त केली नाराजी

    मुंबई : मुंबईतील महापालिका शाळांमध्ये मध्यान्ह भोजन योजना राबवली जात असून यासाठी महिला बचत गटांची निवड करण्यात आली आहे. परंतु यातील काही महिला बचत गटांकडून योग्यप्रकारे मध्यान्ह भोजन पुरवले जात नाही. कुणाच्या भोजनाचा दर्जा योग्य नाही तर कुणी रस्त्यावरच शिजवून मुलांना खिचडी पुरवतात, तर कुणाचा किचन पत्यावर दर्शवलेल्या जागेवरच नाही. मध्यान्ह भोजनामध्ये विविध दिवशी वेगवेगळे भोजन पुरवले जाणे अपेक्षित असतानही काही संस्था मुलांना याचा योग्यप्रकारे पुरवठा करत नाही. त्यामुळे स्थायी समितीमध्ये शिक्षण समिती अध्यक्षांसह सर्वच सदस्यांनी नाराजीचा सूर उमटवल्यानंतर मध्यवर्ती स्वयंपाक गृह अर्थात सेंट्रल किचनचा अवलंब करून आणि इस्कॉनला खिचडी पुरवठा करण्याची जबाबदारी सोपवण्याचा विचार केला जावा अशाप्रकारची मागणी समितीने केली आहे.
    मुंबई महापालिका शाळांमध्ये मध्यान्ह पोषक आहारांतर्गत खिचडीचा पुरवठा करण्यासाठी 45 संस्थांची निवड करण्यात आली असून त्यांना मागील वर्षी 246 कोटी रुपयांचे कंत्राट मंजूर करण्यात आले आहे. यातील काही संस्था बाद ठरल्याने तसेच काळ्यात यादीत टाकण्यात आल्याने प्रतीक्षा यादीवर संस्थांना सामावून घेण्याचा सुधारीत प्रस्ताव स्थायी समितीपुढे मंजुरीला असता शिवसेनेच्या यामिनी जाधव यांनी महिला बचत गटांनी खोटी कागदपत्रे सादर करून कसे काम मिळवले होते. अशा संस्थांना कशी हमी पत्रे दिली होती. त्यामुळे एकप्रकारे या संस्था मुलांच्या भावनांशी खेळत आहे असा आरोप केला. यावर शिक्षण समिती अध्यक्षा राजेश्री शिरवडकर यांनी महापालिका शाळांमध्ये मध्यान्ह भोजन पुरवणाऱ्या विविध संस्थांच्या पुरवण्यात येणारी खिचडी आणि त्यांच्या किचनची पाहणी केली गेली. यामध्ये त्यांचे किचनच उपलब्ध नाही तर खिचडीचा दर्जाच योग्य नाही. प्रत्येक शाळेत हीच अवस्था असून जर ही मोहिती खोटी निघाली तर माझ्या पदाचा राजीनामा देईल असे सांगत हा मोठा घोटाळा असल्याचे सांगितले. तर यातील काही संस्थांना पैसेही दिल्याचे दिपमाला बढे यांनी सांगितले.
    तर भाजपाच्या प्रिती सातम यांनी मुलांना ठराविक उष्माक असलेले भोजन मिळणे आवश्यक असून मागील अनेक वर्षांपासून सेंट्रल किचनची मागणी होत आहे. मग प्रशासन या सेंट्रल किचनला मान्यता का देत नाही. तसेच इस्कॉन या संस्थेचा काही प्रमाणात का होत नाही असा सवाल केला. अश्रफ आझमी यांनीही इस्कॉन या संस्थेचा विचार व्हायला हवा असे सांगत आतापर्यंत किती संस्थांना काळ्या यादीत टाकले आहे आणि किती संस्थाना पेमेंट देण्यात आले आहे याची माहिती मागितली. तर मिनाक्षी पाटणकर यांनी या महिला बचत गटांना 98 ते 99 टक्के गुण कशाच्या आधारावर दिले आणि या संस्था कशा बाद झाल्या असा सवाल केला. जर त्यांना एवढे गुण दिले आहे तर मग मध्यान्ह भोजनाचा दर्जा निकृष्ट कसा असा सवाल केला.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    एका धडकेत सहा जीव संपले; तीन चिमुकल्यांचाही दुर्दैवी अंत!

    October 15, 2026

    मसाल्यांतील भेसळीविरुद्ध राज्यभर कठोर कारवाईचे आदेश!

    October 15, 2026

    पाचोऱ्यात हातमजुराचा आर्थिक विवंचनेतुन गळफास

    October 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif