भगवद्गीता अध्याय १५ वा : भाग ७
श्लोक-क्रं-१५
सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो- मत्त: स्मृतिर्ज्ञानमपोहनं च।
वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो, वेदान्तकृद्वेदविदेव चाहम्॥१५॥
अन्वयार्थ-(संधि-विग्रह)- सर्वस्य च अहं हृदि सन्निविष्ट: मत्त: [मत् त:] स्मृति: ज्ञानम् अपोहनम् च। वेदै: च सर्वै: अहम् एव वेद्य: वेदान्तकृत् वेदविद् एव च अहम्। श्लोकाचा सरळ अर्थ- मी सर्वांच्या हृदयात प्रवेश करुन राहाणारा आहे। स्मृति-आठवण, स्मरण शक्ती, ज्ञान व विस्मृती ही माझ्या पासूनच होतात। सर्व वेदांनी जाणण्यास योग्य मी च आहे। वेदांताचा कर्ता आणि ज्ञाता ही मी च आहे।
स्पष्टीकरण-ईश्वर प्रत्येकाच्या हृदयात आहे, राहातो हा महत्वाचा सिध्दांत या श्लोकात सांगीतला आहे। हृदयस्थ ईश्वराला सर्व भावाने शरण गेल्यास परम शांती व अक्षय सुखाची प्राप्ती होते. ज्ञानेश्वर महराज याचे वर्णन करतात,-
“पाहे पा दूध पवित्र आणि गोड।
पासी त्वचेचिया पदरा आड।
परि ते अव्हेरुनि गोचीड
अशुध्द चि सेवी॥९-५७॥
का कमलकंदा आणि दर्दुरी।
नांदणूक एकेचि घरी।
परि परागु सेविजे भ्रमरी।
येरां चिखलचि उरे॥९-५८॥
ना तरी निदैवाच्या परिवरी।
लोह्या रुतलिया सहस्रवरी।
परि तेथ बैसोनी उपवासु करी।
कां दरिद्री जिये॥ज्ञानेश्वरी-९-५९॥
तैसा हृदयामध्ये मी रामु।
असता सर्व सुखाचा आरामु।
कां भ्रान्तासी कामु विषयावरी॥९-६०॥
गाईचे दूध पवित्र व गोड असते, कासेच्या त्वचेच्या पडद्याच्या आतच आसते, तरी तेथील गोचीड त्याचा त्याग करुन रक्ताचे च सेवन करतात। तसेच कमलाचा कंद आणि बेडूक एकाच ठिकाणी चिखलात राहातत, परंतु भ्रमर दूरून येऊन कमळाचे पराग सेवन करतात व जवळ असलेल्या बेडकाच्या वाट्याला फक्त चिखलच येतो। किंवा एखाद्या दुर्दैवी माणसाच्या घरी (जमिनीत) हजारो मोहोरांनी भरलेल्या कढया असतात, पण त्याचे ज्ञान नसल्यामुळे तो दरिद्री तेथे बसून उपास काढून व दरिद्री अवस्था भोगून जीवन व्यतीत करतो, त्याप्रमाणे, सर्व सुखांचे उगमस्थान असा परमात्मा आपल्या हृदयात असून सुध्दा अज्ञानी लोक सुखाला बाहेर शोधतात। हेच आश्चर्य आहे।
मोको कहां तू ढुंढे रे बंदे? मैं तो तेरे पास मे।
न देवल मे,न मस्जिद मे,न काशी कैलास मे।
नहीं रहु मै अवध द्वारिका,मेरी भेंट विश्वास मे।
नहीं रहुं मैं क्रिया कर्म मे,न बैराग संन्यास मे॥
खोजोगे तो अभी मिलूंगा पल भर की तलाश मे॥
शहर के बाहर डेरा हमारा, कुटिया मेरी श्वास मे।
कहत कबीर सुनो भाई साधो सब संतन के पास में॥१॥
गाईचे दूध पवित्र व गोड असते, कासेच्या त्वचेच्या पडद्याच्या आतच आसते, तरी तेथील गोचीड त्याचा त्याग करुन रक्ताचे च सेवन करतात। तसेच कमलाचा कंद आणि बेडूक एकाच ठिकाणी चिखलात राहातत, परंतु भ्रमर दूरून येऊन कमळाचे पराग सेवन करतात व जवळ असलेल्या बेडकाच्या वाट्याला फक्त चिखलच येतो। किंवा एखाद्या दुर्दैवी माणसाच्या घरी (जमिनीत) हजारो मोहोरांनी भरलेल्या कढया असतात, पण त्याचे ज्ञान नसल्यामुळे तो दरिद्री तेथे बसून उपास काढून व दरिद्री अवस्था भोगून जीवन व्यतीत करतो, त्याप्रमाणे, सर्व सुखांचे उगमस्थान असा परमात्मा आपल्या हृदयात असून सुध्दा अज्ञानी लोक सुखाला बाहेर शोधतात। हेच आश्चर्य आहे।

रिटायर्ड मेडीकल ऑफिसर
नांदगाव, जि. नाशिक
मो. ९८२२४२८५७२

