Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • पारडी येथे “आदिवासी सल्ला शक्ती स्थापना दिन” उत्साहात
    • भुसावळच्या प्रभारी नगराध्यक्ष शैलजा नारखेडे यांचे अभिनंदन!
    • खालसा हेल्प फाउंडेशनची कार्यकारिणी जाहीर
    • पुढील 3 दिवसात विक्रमी तापमानाची नोंद होणार
    • आरटीआय कार्यकर्त्याची भरदिवसा ठेचून हत्या
    • लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात
    • तीन लहान मुलांनी आरोपीला रोखण्याचा केला होता प्रयत्न
    • सूर्यनारायण कोपला.. काळजी घ्या..!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी शिक्षा
    गुन्हे वार्ता

    अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी शिक्षा

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJanuary 14, 2025No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    मलकापुर, लोकशाही न्यूज नेटवर्क

    अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपीस वीस वर्षे शिक्षा व 51 हजार तसेच दंड भरल्यास दोन वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा देण्याचा आदेश दि. 13 जानेवारी 25 रोजी मलकापूर येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा विशेष न्यायाधीश एस. व्ही जाधव यांनी आरोपीस सुनावला आहे.

    याबाबत अधिक माहिती अशी की मलकापूर येथे राहणारी अल्पवयीन मुलीला आरोपी भगवान संतोष भोपळे रा. मलकापूर यांनी पीडित मुलगी ही दुकानात चॉकलेट खाऊन घरी परत येत असताना आरोपीने तिला घरी बोलावले व घरामध्ये ओढून घेतले व पीडितेवर लैंगिक अत्याचार केला सदर घटनेबाबत पीडितेच्या आईने पोलीस स्टेशन मलकापूर शहर येथे अ. प नं 6/2020 नुसार कलम 376 (ए)(बी ), 342 भा. द. वी सह कलम 4, 5 (एम)6 बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

    सदरचे गुन्ह्यात आरोपीला अटक करून तपासांती दोषारोप पत्र विशेष न्यायालय मलकापूर येथे दाखल करण्यात आले होते. सदर प्रकरणातील आरोपी भगवान संतोष भोपळे याचे विरुद्ध सदरचे प्रकरण चालवण्यात आले सरकार पक्षातर्फे सदर प्रकरणात 12 साक्षीदार तपासण्यात आले त्यापैकी पिडीता, तिची आई, पिडीतेचा भाऊ व तपास अधिकारी यांचे पुराव्यानंतर आरोपी भगवान संतोष भोपळे याची विरुद्ध गुन्हा सिद्ध झाला.

    दरम्यान अंतिम सुनावणी होवून सरकार पक्षातर्फे ॲड शैलेश हरिहर जोशी विशेषसरकारी अभियोक्ता यांनी केलेला प्रभावी युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी भगवान संतोष भोपळे रा. मलकापूर यास अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याचे कलम 6 सहवाचणीय कलम5 (एम) नुसार 20 वर्षे सश्रम करावासाची शिक्षा व 25000 रुपये दंड न भरल्यास दोन वर्षे सक्त मजुरी तसेच कलम 4 (2) पोक्सो कायद्यानुसार 20 वर्ष सश्रम करावासाची शिक्षा व 25 हजार रुपये दंड न भरल्यास 2 वर्षे सक्त मजुरीची शिक्षा, कलम 342 भा. द. वी नुसार 1 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा व एक हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली आरोपी भगवान संतोष भोपळे यांच्याकडून 51 हजार रुपये दंड वसूल झाल्यानंतर सदर रक्कम पिडीतेला देण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.

    तसेच सामाजिक न्याय विभागामार्फत देण्यात येणारे पीडित नुकसान भरपाई योजनेअंतर्गत सुद्धा विधी सेवा प्राधिकरण बुलढाणा यांना अतिरिक्त नुकसान भरपाई ठरवून देणे पिडीतेला देण्याबाबत सुद्धा आदेश देण्यात आला आहे. सदर प्रकरणाचा प्राथमिक तपास पो. उप. नि घनश्याम पाटील व उर्वरित तपास पो. उप. नि गणेश शिंदे यांनी केला होता तसेच पैरवीधिकारी म्हणून पोलीस उपनिरीक्षक संतोष भिकाजी कोल्हे पो. स्टे मलकापूर शहर यांनी काम पाहिले फिर्यादी तर्फे ॲड प्रभाकर चंद्रशेखर कुळकर्णी यांनी सरकार पक्षास मदत केली.

    #crime District and Sessions Court Juvenile Malkapur Punishment Sexual Abuse Special Judge
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    आरटीआय कार्यकर्त्याची भरदिवसा ठेचून हत्या

    May 13, 2026

    तीन लहान मुलांनी आरोपीला रोखण्याचा केला होता प्रयत्न

    May 13, 2026

    सदावर्ते यांच्या गाडीवर शाई, सुपाऱ्या फेकणे पडले महागात

    May 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif