‘महाभारत’ फेम अभिनेत्याला 13 लाखांचा गंडा

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

अनेकदा सामान्य लोकांप्रमाणे फिल्मस्टार्सची सुद्धा आता फसवणूक झाल्याची प्रकरणे समोर येत आहेत. अशीच एक घटना ‘महाभारत’ (Mahabharat) फेम अभिनेता पुनीत इस्सरबरोबर (Puneet Issar) घडली आहे.

ज्येष्ठ अभिनेते पुनीत इस्सर फसवणुकीचे बळी ठरले आहेत. आरोपींनी पुनीत इस्सर यांचे खाते हॅक करून लाखो रुपयांची फसवणूक केल्याचं माहिती समोर आली आहे. तपासानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण मुंबई परिसरात पुनीत यांचा शो आयोजित करण्यात आला होता. आरोपीने आधी त्यांचा ईमेल आयडी हॅक केला. नंतर त्यांनी शोच्या बुकिंगमधून मिळालेले 13.76 लाख रुपये हडप करण्याचा प्रयत्न केला. जेव्हा पुनीत यांनी काही कामासाठी त्यांचा ईमेल पाहिला तेव्हा ही गोष्ट त्यांच्या निदर्शनास आली. त्यानंतर पुनीत इस्सर यांनी तत्काळ ओशिवरा पोलिस चौकीत (Oshiwara Police) तक्रार नोंदवली.

या प्रकरणावर तपास करणारे पोलीस अधिकारी म्हणाले की, “तपासादरम्यान, आम्ही इस्सर यांचा शो ‘जय श्री राम-रामायण’ रद्द करण्याबद्दल एनसीपीएकडे चौकशी केली आणि बँक खात्यात 13.76 लाख रुपये ट्रान्सफर केल्याचा तपशील मिळाला. या माहितीच्या आधारे आम्ही उत्तर मुंबईतील मालवणी परिसरातून आरोपीला पकडले.” कायद्याच्या तरतुदीनुसार त्या आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयाने त्याला 28 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.