Friday, May 20, 2022

टीईटी गैरव्यवहार: अपात्र परीक्षार्थींची छाननी सुरू

spot_imgspot_img
- Advertisement -
- Advertisement -

लोकशाही न्युज नेटवर्क 

- Advertisement -

पुणे : शिक्षक पात्रता परीक्षा (TET Exam Sacm) गैरव्यवहार प्रकरणात ७ हजार ८८० अपात्र परीक्षार्थींना पात्र करून त्यांचा नंबर मूळ निकालात घुसविल्याने निष्पन्न झाल्यानंतर आता सायबर पोलिसांनी २०१८ मध्ये झालेल्या टीईटी परीक्षेतील अपात्र परीक्षार्थीपैकी किती जणांना पैसे घेऊन पात्र केले याची छाननी सुरू केली आहे.

- Advertisement -

ही संख्या जवळपास २ हजारांच्या घरात जाण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. २०१९-२० च्या टीईटी परीक्षेमध्ये तुकाराम सुपे (tukaram supe) याने जी. ए. सॉफ्टवेअरच्या डॉ. प्रीतीश देशमुख (pritish deshmukh) व इतर एजंटांच्या मदतीने ७ हजार ८८० अपात्र परीक्षार्थींना पात्र ठरविले होते. त्यावेळी परीक्षा दिलेल्यांपैकी १६ हजार ५९२ जण पात्र ठरले होते.

२०१८ मधील टीईटी परीक्षेत ९ हजार ६७७ परीक्षार्थी पात्र ठरले होते. सुखदेव डेरे (sukhdev dere) याने २०१८ मध्ये टीईटी जी. ए. सॉफ्टवेअरचा आश्विनकुमार (ashwinkumara ga software) व इतरांना हाताशी धरून पैसे घेऊन अपात्र परीक्षार्थींना पात्र ठरविले होते. यातील प्रमुख एजंट संतोष व अंकुश हरकळ यांना मुकुंदा सूर्यवंशी या सबएजंटने ८० लाख रुपये दिले होते. याशिवाय इतर आश्विनकुमार याला ५ कोटी रुपये मिळाले होते.

आरोपींना मिळालेले पैसे आणि त्यांच्याकडील याद्या पाहता २०१८ मध्येही त्यांनी जवळपास २ हजारांपर्यंत अपात्र परीक्षार्थींना पैसे घेऊन पास केल्याचे अंदाज आहे. २०१८ मध्ये पात्र ठरलेल्या सर्व परीक्षार्थीचे ओएमआर शीटची तपासणी पोलिसांनी सुरू केली आहे. त्यातून नेमक्या किती जणांना आरोपींना पास केले हे स्पष्ट होणार आहे.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या