जीवलग मित्रांचा एकाच झाडाला गळफास

टोकाचा निर्णय : कारण मात्र गुलदस्त्यात

0

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जामखेडमधून पिंपरी चिंचवडमध्ये आलेल्या दोन मित्रांनी एकाच झाडाला गळफास घेऊन आयुष्य संपवले. मोर्शीतील निर्जनस्थळी जात दोघांनी टोकाचा निर्णय घेतलाय. त्यामुळे संपूर्ण पिंपरी चिंचवडमध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान, दोघांच्या आत्महत्याचे कारण काय? याबाबत पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

तुषार अशोक ढगे (वय 25), सिकंदर सल्लाउद्दीन शेख वय (30 राहणार हुंडा पिंपळगाव, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर) अशी आत्महत्या केलेल्या दोघांची नावे आहेत. मयत तुषार यांचा चुलता दत्तात्रय रावसाहेब ढगे राहणार सणसवाडी तालुका शिरूर यांनी याबाबत माहिती दिलेली आहे. प्राथमिक माहितीनुसार हे दोघे एकमेकांचे मित्र असून काल मूळ गावावरून पुण्याला आल्याचे समजले आहे.

एमआयडीसी भोसरी पोलीस स्टेशन हद्दीतील भारतमाता चौकाजवळील खिरीड वस्ती, मोशी या ठिकाणी आज एका लिंबाच्या झाडाच्या एकाच फांदीला दोन इसमांनी गळफास घेतला आहे. दोघांच्या मृत्यूची चौकशी करीत आहोत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. हे दोघे ही चालक आहेत, मात्र त्यांनी एकत्रित आत्महत्या का केली असावी? याचे कारण अद्याप ही अस्पष्ट आहे. मोशीतील निर्जनस्थळी दोघांनी एकाच झाडाला एकाचवेळी गळफास घेतल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.