Thursday, May 26, 2022

धक्कादायक.. विधवा महिलेवर 8 जणांचा बलात्कार

spot_imgspot_img
- Advertisement -
- Advertisement -

लोकशाही न्यूज नेटवर्क

- Advertisement -

शिरूर

- Advertisement -

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात आठ नराधमांनी एका विधवा महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपींनी पीडित महिलेला विविध ठिकाणी घेऊन जात तिला नरक यातना दिल्या आहेत. तब्बल सात महिन्यांनी हा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व आरोपींना अटक केली आहे. आरोपींना न्यायालयात हजर केलं असता, न्यायालयाने आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. माऊली पवार, रज्जाक पठाण, काळू वाळुंज, विठ्ठल काळे, राजेश उर्फ पप्पू गायकवाड, आकाश गायकवाड, संदीप वाळुंज, नवनाथ वाळुंज अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावं आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 32 वर्षीय पीडित महिला शिरूर तालुक्यातील एका गावात एकटी राहते. ती विधवा असून स्वभावाने थोडीशी भोळसर आहे. तिच्या निराधारपणाचा आणि एकटेपणाचा फायदा घेत आठ जणांनी तिच्यासोबत धक्कादायक कृत्य केलं आहे. आरोपींनी पीडित महिलेला कधी तिच्या घरात, उसाच्या शेतात, शाळेच्या पाठीमागे आणि नदीकिनारी अशा विविध ठिकाणी घेऊन जात तिच्यावर अत्याचार केला आहे. आरोपींनी वेगवेगळ्या दिवशी एकएकट्याने जीवे मारण्याची धमकी देत तिच्यासोबत घृणास्पद कृत्य केलं आहे. या अत्याचारातून पीडित महिला गर्भवती राहिली आहे.

सहा महिन्यांची गर्भवती राहिल्यानंतर पीडित महिलेनं याबाबतची माहिती शेतात काम करणाऱ्या एका महिला सहकाऱ्याला दिली. त्यानंतर हळुहळू संपूर्ण गावभर या घटनेची चर्चा झाली. या घटनेची माहिती पोलिसांनी मिळताच पोलिसांनी निर्भया पथक पाठवून पीडितेची चौकशी केली आहे.

तिला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता, तिने घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला आहे. यानंतर पीडित महिलेचा भाऊ आणि भावजयीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आठ संशयित आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी शुक्रवारी आरोपींना न्यायालयात हजर केलं असता, न्यायालयाने त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या