पुण्यात डेमू रेल्वे रुळावरुन घसरली; मोठी दुर्घटना टळली

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क

पुण्यात डेमू रेल्वे रुळावरुन घसरली आहे. डेमू रेल्वेचे काही डबे रुळावरुन घसरल्याची माहिती समोर आली आहे. पुणे रेल्वे स्थानकाजवळ ही घटना घडली आहे. सकाळी साडे नऊ वाजता ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच रेल्वेचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

डेमू रेल्वेचे काही डबे रुळावरुन घसरल्याने रेल्वे वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला आहे. रेल्वेचे कर्मचारी, अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून रेल्वे सेवा पूर्ववत करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

ही रेल्वे दौंडच्या दिशेने जात होती त्यावेळी ही घटना घडली आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जिवितहानी झालेली नाहीये. हा अपघात नेमका कशामुळे झाला याची माहिती अद्याप समोर आलेली नाहीये. आठ दिवसांपूर्वी पश्चिम बंगालमध्ये रेल्वे अपघात 13 जानेवारी रोजी पश्चिम बंगालमध्ये रेल्वे अपघाताची मोठी घटना घडली होती.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here