इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन

0

 लोकशाही न्यूज नेटवर्क 

पुणे; इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन. शहरातील जंगली महाराज रस्त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांसहा घोडे,बैलगाडी, सायकल घेऊन इंधन दरवाढीच्या विरोधी आंदोलन करण्यात आले. यावेळी पदाधिकाऱ्यांनी घोडे तसे बैलगाड्यावर स्वार होत “मोदी तेरा अजब खेल सस्ती दारु, मेहेंगा तेल”, “मोदी सरकार हाय हाय” , “सर्व सामान्यांच्या खिशावर दरोडा टाकणाऱ्या मोदी सरकारचा निषेध असो”  अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला.

अच्छे दिनचे स्वप्न दाखवत सत्तेत आलेल्या नरेंद्र मोदींनी संपूर्ण भारताला “अश्मयुगीन दिवस” दाखवायला सुरुवात केली आहे. मोदींनी अजून थोडी कृपा केली. तर आता काही दिवसात जे चित्र दिसणार आहे, ते चित्र आज पुणे शहरातील जंगली महाराज रस्त्यावर बघायला मिळाले.

यापुढील काळात संपूर्ण देशात हीच परिस्थिती पाहायला मिळणार आहे. दुचाकीवर फिरणारे काही दिवसात घोड्यांवर दिसतील. आपल्या कार ने प्रवास करणारे नागरिक काही दिवसांत  बैलगाडीमध्ये दिसतील. हा ऐतिहासिक बदल होण्यास कारणीभूत ठरली असल्याचे कार्यकर्त्यांनी यावेळी सांगितले.

”आपल्या हितसंबंधी उद्योगपतीच्या कल्याणासाठी दररोज भाजप सरकार सर्वसामान्य कुटुंबावर दरोडा टाकत असून, अजून किती दिवस या विरोधात आपण गप्प बसायचे…? आजचा सवाल या सर्वांनी संतप्त होत मोदी सरकारला विचारला.

गेल्या ८ दिवसात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे हे तिसरे आंदोलन असून महागाई कमी केली नाही, तर दररोज सर्वसामान्य जनता याच प्रकारे रस्त्यावरून उतरून निषेध करणार असे मत शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी व्यक्त केले.”

Leave A Reply

Your email address will not be published.