फोटोशूटसाठी गेलेल्या तीन युवकांचा बुडून मृत्यू

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

पुणे 

दौंड: येथील दौंड नगरपालिकेच्या पाणी साठवण तलावावर फोटो शूटसाठी गेलेल्या तीन युवकांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. येथील दौंड कुरकुंभ मार्गावरील मोरेवस्ती जवळील  नगरपालिकेच्या पाणी साठवण तलावमध्ये तिघे बुडाले. या घटनेतील दोन युवक सख्खे चुलत भाऊ असून, तिसरा त्यांचा मित्र आहे. आसरार अलीम काझी (वय २१), करीम अब्दुल  हादी फरीद काझी (वय २०), अतिक उझजमा फरीद शेख (वय २० तिघेही राहणार दौंड) असे मृत्युमुखी पडलेल्या युवकांचे नावे आहे.

हे तिघे रविवार ६ मार्च रोजी दुपारी दुचाकी घेऊन फिरावयास गेले होते. दिवसभरात घरी आले नाही म्हणून त्यांच्या घरच्यांनी संपर्क साधला असता त्यांचा संपर्क झाला नाही परिणामी  तिघेही नगरपालिकेच्या पाणी साठवण तलावावर जाणार असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांना मिळाली त्यामुळे घरच्यांनी या परिसरामध्ये त्यांचा शोध घेत असताना तलावाशेजारी त्यांची दुचाकी, कपडे व बॅग नजरेस पडली.

मुले पाण्यात बुडाले असल्याची शंका त्यांना आली. पोलीस आणि ग्रामस्थांच्या मदतीने त्यांचे मृतदेह पाण्याबाहेर काढले यातील एक युवक पाण्यात उतरला त्याला पोहता येत नसल्याने तो पाण्यात बुडू लागला त्याला वाचविण्यासाठी दुसऱ्याने उडी मारली या दोघांनाही पाण्याबाहेर येता येत नाही म्हणून तिसऱ्या मी उडी मारली दुर्दैवाने तिघांचा मृत्यू झाला या घटनेमुळे दौंड शहरात शोककळा पसरली आहे

Leave A Reply

Your email address will not be published.