Monday, September 26, 2022

आयटी इंजिनिअर तरुणीवर कंपनीतील व्यवस्थापकानेच केला बलात्कार

- Advertisement -

लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

पुणे : येथील अहमदाबाद येथून पुण्यात नोकरीसाठी आलेल्या आयटी इंजिनिअर तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर कंपनीतील व्यवस्थापकानेच बलात्कार केल्याचा व तिची बदनामी केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला. याप्रकरणी मुख्य आरोपीसह दोघांवर हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

- Advertisement -

राहुल कुमार सिंह (37, खराडी, पुणे) आणि मालव आचार्य (रा. अहमदाबाद) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत अहमदाबाद येथील एका 31 वर्षीय तरूणीने फिर्याद दिली आहे.

तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक एस. एस. गोसावी यांनी सांगितले, फिर्यादी तरूणी ही आयटी इंजिनिअर आहे. तर संशयीत आरोपी राहुलकुमार हा खराडी येथील एका कंपनीत व्यवस्थापक पदावर कार्यरत होता.

ऑक्टोंबर 2020 च्या कालावधीत दोघेही एका ठिकाणी कार्यरत असताना. झालेल्या ओळखीचा फायदा घेऊन त्याने तिला प्रेम जाळ्यात ओढले. पहिल्या पत्नीला घटस्फोट देऊन तुझ्याबरोबर लग्न करतो असे आश्वासन त्याने फिर्यादीला दिले. त्यानंतर त्याने तिच्यावर वेगवेगळ्या ठिकाणी लैंगिक अत्याचार केले.

मित्राच्या मदतीने केली तरुणीची बदनामी

हा सर्व प्रकार सुरू असतानाच तरूणीने राहुल कुमारला लग्नाबाबत विचारणा केली. परंतु, त्याने फिर्यादीच्या आणि त्याच्या सामायीक मित्राच्या मदतीने कंपनीत तसेच राहत्या ठिकाणी तिची बदनामी केली.

तसेच तिला पुन्हा गुजरात येथे जाण्यास भाग पाडले. त्यानंतर त्याने तु जर पोलिसांत तक्रार दिली तर तुझ्यावर बलात्कार करण्यास सांगेन, तुझा अपघात घडवून आणेल ते तुला समजणारही नाही अशा आशयाच्या धमक्या तिला दिल्या. त्याने मारहाण केल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

राहुलकुमार आणि त्याचा साथीदार मालव आचार्य हे दोघेही फरार झाले आहेत. हडपसर पोलिस त्याचा शोध घेत आहे. हा सर्व प्रकार ऑक्टोबर 2020 ते जून 2021 दरम्यान घडला. गुन्ह्याचा पुढील तपास महिला पोलिस उपनिरीक्षक एस. एस. गोसावी करीत आहेत.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या