पैशांचा माज.. सिग्नलवर BMW थांबवून अश्लील चाळे

रस्त्याच्या बाजूला लघुशंका अन्

0

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क 

विद्येच्या माहेरघरात हे चालले काय ? हा प्रश्न आता चव्हाट्यावर आलाय. पुण्यात गुन्हेगारीच्या घटनांनी सातत्याने चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यातील कल्याणीनगर भागात एका बिल्डरच्या मुलाने मद्यधुंद अवस्थेत पोर्श कार चालवत दोन आयटी इंजिनिअर तरुण-तरुणीला उडवलं होतं. त्यातच आता एका बड्या बापाच्या पोराचा प्रताप समोर आला आहे.

पुण्यातील येरवडा परिसरात एका तरुणाने मद्यधुंद अवस्थेत बीएमडब्ल्यू कार चालवली आहे. एवढंच नव्हे तर त्याने भर सिग्नलवर कार थांबवून अश्लील चाळे केले आहेत. संबंधित तरुण सिग्नलवर कार थांबवून रस्त्याच्या बाजुला लघुशंका करत होता. यावेळी पाठीमागून आलेल्या एका व्यक्तीने हा सगळा प्रकार आपल्या मोबाईलमध्ये कैद केला. ही बाब आरोपी तरुणाला समजल्यानंतर त्याने कॅमेऱ्याकडे पाहून अश्लील चाळे केले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना पुण्यातील येरवडा भागातील शास्त्रीनगर चौकात घडली आहे. ज्यावेळी तरुण गाडीतून उतरुन लघुशंका करत होता. तेव्हा तिथे काही महिला देखील असल्याची माहिती आहे. तरीही हा बड्या बापाचा निर्लज्ज पुत्र स्त्रियांच्या समोरच उभं राहून लघवी करत होता. दुसरा एक तरुण गाडीत बसून होता. त्याच्या हातात देखील दारुची बाटली होती. हा व्हिडीओ काढत असताना दोघांनी व्हिडीओ काढणाऱ्यासोबत मुजोरी केली. दरम्यान हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून यावर कठोर करावी अशा संतापजनक प्रतिक्रिया उमटत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.