Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • शिक्षकाचे चौथीच्या ५ विद्यार्थिनींशी अश्लील चाळे
    • तर अमेरिका इराणचे सर्वकाही नष्ट करेल..
    • फरार फौजदारासह पुत्राला अटक
    • इराण-इस्त्रायल युद्धामुळे साखरेचा गोडवा हरवला
    • सावित्रीमाईंची क्रांती हाच स्त्री शिक्षणाचा खरा आधार!
    • पत्रकार, वृत्तपत्र विक्रेते महामंडळे लवकरच स्थापन करणार!
    • स्थानिक आणि संजय गांधी उद्यान प्रशासनात वाद!
    • हुंडाबळीच्या घटना पुरोगामी महाराष्ट्रात धक्कादायक!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन
    महाराष्ट्र

    साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveFebruary 26, 2026Updated:February 26, 2026No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा 42 मौलिक ग्रंथांचे प्रकाशन करण्यात येणार आहे. हा प्रकाशन सोहळा नाशिक येथील मराठा विद्या प्रसारक समाजाचे के.टी.एच.एम. महाविद्यालय येथे आयोजित करण्यात आला आहे.

    मंडळाच्या स्थापनेपासून ‘पुस्तक प्रकाशन’ हे मुख्य उद्दिष्ट ठेवून गंभीर, वैचारिक, संशोधनपर आणि मौलिक विषयांवरील ग्रंथनिर्मिती सातत्याने केली जात आहे. खासगी प्रकाशकांकडून सहसा प्रकाशित न होणारे उच्च दर्जाचे संशोधनात्मक ग्रंथ प्रकाशित करण्याची जबाबदारी मंडळ पार पाडत आहे. आजवर मंडळाने 730 हून अधिक ग्रंथ प्रकाशित केले असून दरवर्षी मराठी भाषा गौरव दिनी नव्या ग्रंथांचे प्रकाशन करण्याची परंपरा जपली आहे.

    यंदाच्या 42 ग्रंथांमध्ये विविध क्षेत्रांतील महत्त्वपूर्ण साहित्याचा समावेश आहे. वारकरी परंपरेतील संतश्रेष्ठ संत तुकाराम महाराज यांच्या ‘तुकारामबावांच्या अभंगाची गाथा’ या ग्रंथाचा समावेश विशेष उल्लेखनीय आहे. तसेच अंजली मालकर लिखित ‘हिंदुस्थानी अभिजात संगीताचा इतिहास’ (पूर्वार्ध व उत्तरार्ध) या दोन खंडांत तेराव्या शतकापासून स्वातंत्र्यप्राप्तीपर्यंतच्या संगीत प्रवासाचा अभ्यासपूर्ण आढावा घेण्यात आला आहे.

    मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्यावरील ‘दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर – कर्तृत्वाचा एक शोध’ हे तीन खंड प्रकाशित होत असून, त्यातील तिसऱ्या खंडात त्यांनी प्रथम मुद्रित केलेली ‘ज्ञानेश्वरी’ समाविष्ट आहे.

    ‘शिवशक्ती संप्रदायाची लोक-गान परंपरा’, ‘महाराष्ट्राचे शिल्पकार विद्वत्तेचा महामेरु डॉ. सी. डी. देशमुख’, ‘मराठीतील रहस्य-रंजनप्रधान लोकप्रिय कादंबरी परंपरा आणि प्रवाह’, तसेच ओडिसी नृत्यशैलीवरील ‘ओद्रमागधी ते ओडिसी नृत्य – एक प्रवास’ हेही ग्रंथ प्रकाशित होत आहेत.

    1940 ते 1990 या कालखंडातील महत्त्वाच्या साहित्यिकांवर आधारित परिचयात्मक ग्रंथमालिकेतील ग्रंथांचाही समावेश आहे. यात पु. ल. देशपांडे, नामदेव ढसाळ, विंदा करंदीकर, अण्णाभाऊ साठे, नारायण सुर्वे आदी साहित्यिकांच्या जीवन व साहित्याचा मागोवा घेण्यात आला आहे. तसेच ‘रायगडची जीवनकथा’ या ग्रंथाचे आठवे पुनर्मुद्रण प्रकाशित होत असून या ग्रंथाला वाचकांचा मोठा प्रतिसाद लाभला आहे.

    मंडळाच्या ‘नवलेखक अनुदान’ योजनेअंतर्गत यंदा 19 नवोदित लेखकांची पुस्तके प्रकाशित होत आहेत. काव्य, कथा, कादंबरी, नाटक, ललितगद्य आणि बालवाङ्मय अशा विविध साहित्यप्रकारांतील ही पुस्तके असून नवोदितांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा मंडळाचा हा उपक्रम विशेष उल्लेखनीय आहे.

    मंडळाचे सर्व ग्रंथ  https://sahitya.marathi.gov.in या संकेतस्थळावर विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच शासकीय मुद्रणालय व खाजगी वितरकांकडेही अत्यल्प दरात हे ग्रंथ उपलब्ध आहेत. वाचकांच्या भरघोस प्रतिसादामुळे अनेक ग्रंथांचे पुनर्मुद्रण करावे लागत असल्याचे मंडळाकडून सांगण्यात आले. मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने आयोजित या प्रकाशन सोहळ्यामुळे मराठी साहित्य-संस्कृतीच्या जतन व संवर्धनाला मोठी चालना मिळणार आहे.

    #maharashtra Book Production Book Publication Maharashtra State Literature and Culture Board Marathi Language Pride Day Nashik Publication Ceremony
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    शिक्षकाचे चौथीच्या ५ विद्यार्थिनींशी अश्लील चाळे

    March 10, 2026

    फरार फौजदारासह पुत्राला अटक

    March 10, 2026

    इराण-इस्त्रायल युद्धामुळे साखरेचा गोडवा हरवला

    March 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.