राज्यात दहीहंडीच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी…

0

 

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क;

आता राज्यात इतर सानंसारखी दहीहंडीच्या दिवशीही सार्वजनिक सुट्टी असणार असल्याचे चित्र आहे. राज्यात दहीहंडीच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याच्या सूचना राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्य सचिवांना देणार आहेत. तशी माहिती खुद्ध एकनाथ शिंदे यांनीच माध्यमांशी बोलताना दिली आहे.

दहीहंडी गोविंदा उत्सव हा महाराष्ट्रातला सर्वात मोठा सण आहे. काही ठिकाणी सार्वजनिक सुट्टी जिल्हाधिकारी जाहीर करतात. पण मी मुख्यसचिवांना सांगून दहीहंडीच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याच्या सूचना मी देणार आहे”, असं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

गणेशोत्सव आणि दहीहंडीवर यावर्षी कुठलेही निर्बंध नसतील, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यापूर्वीच केली आहे. तसेच दहीहंडीच्या थरांच्या उंचीबाबत गोविंदांनी न्यायालयाने घालून दिलेल्या नियमांचं पालन करावं, असे मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं आहे. याचदरम्यान शिंदे गटातील शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी दहीहंडीच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याची मागणी केली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.