Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • आदिवासी लोक संघर्ष मोर्चाला किती ताण देणार?
    • दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी तुटपुंज्या मदतीत!
    • एका धडकेत सहा जीव संपले; तीन चिमुकल्यांचाही दुर्दैवी अंत!
    • मसाल्यांतील भेसळीविरुद्ध राज्यभर कठोर कारवाईचे आदेश!
    • पाचोऱ्यात हातमजुराचा आर्थिक विवंचनेतुन गळफास
    • अदानी-अंबानींचे २० लाख कोटी रुपयांचे कर्जमाफी मग..
    • एसटी तोट्यात, तरी भाडेवाढीचा भार टाकणार नाही!
    • वाचनातून व्यक्तिमत्व सर्जनशील होते : चंद्रकांत चव्हाण
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»ताज्या बातम्या»सायबर गुन्ह्यांपासून संरक्षणासाठी जनजागृती हीच ‌‘फायरवॉल‌’!
    ताज्या बातम्या

    सायबर गुन्ह्यांपासून संरक्षणासाठी जनजागृती हीच ‌‘फायरवॉल‌’!

    rajelok11@gmail.comBy rajelok11@gmail.comOctober 3, 2026No Comments32 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार : ‌‘बी सायबर स्ट्रीट स्मार्ट‌’ मोहिमेचा शुभारंभ

    मुंबई : शहरे, लहान गावे आणि ग्रामीण भागातील नागरिकांचा ऑनलाइन वावर वाढत असताना त्यांना सायबर गुन्ह्यांच्या नवनवीन प्रकारांचा धोका निर्माण होत आहे. त्यामुळे डिजिटल जनजागृती आणि डिजिटल स्वच्छता पूर्वीपेक्षा अधिक महत्त्वाची असून, भविष्यातील सायबर गुन्ह्यांपासून नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी जनजागृती हीच प्रभावी ‌‘फायरवॉल‌’ ठरू शकते, असे माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी सांगितले.
    डेटा सिक्युरिटी कौन्सिल ऑफ इंडियाच्या (डीएससीआय) सायबर सुरक्षा जनजागृती अंतर्गत देशव्यापी ‌‘बी सायबर स्ट्रीट स्मार्ट‌’ मोहिमेचा शुभारंभ मंत्री ॲड. शेलार यांच्या हस्ते मुंबईतील बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजमध्ये (बीएसई) झाला. महिनाभर चालणाऱ्या या मोहिमेत नागरिकांना दैनंदिन सायबर सुरक्षेच्या सवयींबाबत मार्गदर्शन करण्यासह कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने होणारी फसवणूक आणि वाढत्या सायबर गुन्ह्यांविषयी जागरूक करण्यात येणार आहे. मंत्री ॲड. शेलार म्हणाले की, निवृत्तिवेतनधारक, गुंतवणूकदार, ऑनलाइन शिक्षण घेणारे विद्यार्थी, डिजिटल उपकरणे वापरणाऱ्या माता तसेच ई-स्पोर्ट्‌स खेळाडू अशा प्रत्येक घटकाने ऑनलाइन सुरक्षिततेसाठी आवश्यक खबरदारी समजून घेणे गरजेचे आहे. प्रत्येक नागरिकापर्यंत सोपे आणि व्यवहार्य सुरक्षाविषयक संदेश पोहोचविणारी ही बहुघटक मोहीम कुटुंबे, व्यवसाय आणि समुदायांच्या सायबर सुरक्षेला बळकटी देईल. ‌‘कठपुतळी‌’ ही संकल्पना सायबर संरक्षणाचे महत्त्व प्रभावीपणे मांडते. ही मोहीम देशातील सर्वांत व्यापक सायबर जनजागृती मोहिमांपैकी एक ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

    सतर्क राहणे आवश्यक!
    सायबर सुरक्षेबाबत माहिती देताना माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह म्हणाले की, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून नागरिकांना लक्ष्य करणारे सायबर धोके वेगाने बदलत आहेत. त्यांचा सामना करण्यासाठी केवळ तांत्रिक संरक्षण पुरेसे नसून प्रत्येक व्यक्तीने सतर्क राहणे आवश्यक आहे. ‌‘बी सायबर स्ट्रीट स्मार्ट‌’सारख्या मोहिमांमधून डिजिटल धोक्यांचे स्वरूप सोप्या पद्धतीने समजावून सांगितले जात असून नागरिकांना व्यवहार्य सुरक्षाविषयक सवयी अंगीकारण्यासाठी सक्षम केले जात आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    rajelok11@gmail.com

    Related Posts

    एका धडकेत सहा जीव संपले; तीन चिमुकल्यांचाही दुर्दैवी अंत!

    October 15, 2026

    मसाल्यांतील भेसळीविरुद्ध राज्यभर कठोर कारवाईचे आदेश!

    October 15, 2026

    पाचोऱ्यात हातमजुराचा आर्थिक विवंचनेतुन गळफास

    October 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif