Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दिल्लीतील इमारत कोसळली; किती विद्यार्थी दबले गेले?
    • यावल–रावेर बसमधून सोन्याच्या दोन वाट्या चोरीला
    • यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा महापूर; प्रशासन गप्प का?
    • भुसावळ राष्ट्रवादीचे ११ नगरसेवक शिवसेनेत; सावकारे गटात अस्वस्थता!
    • बापरे! मुख्य वीज उपकेंद्रात भीषण स्फोटाने खळबळ!
    • दिल्लीत 5 मजली इमारत कोसळली
    • महाराष्ट्रातील ‘या’ भागांमध्ये पावसाचा इशारा
    • नव्या टीमनंतर केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना वेग
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»ताज्या बातम्या»चोपड्यात वेश्याव्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश
    ताज्या बातम्या

    चोपड्यात वेश्याव्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMay 30, 2026No Comments1,360 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    सहा पीडित महिलांची सुटका : 11 जणांवर गुन्हे दाखल
    जळगाव – चोपडा शहर पोलिस स्टेशनच्या पथकाने शहरातील प्रताप हायस्कूल आणि तहसील कार्यालयाच्या पाठीमागील परिसरात सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या धडक कारवाईत पोलिसांनी 6 पीडित महिलांची सुटका केली असून, दोन महिला आरोपींना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी एकूण 11 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार 9 जण फरार झाले आहे. या कारवाईने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
    पोलिसांना मिळालेल्या खात्रीशीर गोपनीय माहितीच्या आधारे, शुक्रवार दि 29 मे सायंकाळी 6:40 वाजेच्या सुमारास चोपडा शहरातील प्रताप हायस्कूलच्या मागे, तहसील कार्यालयाच्या मागील बाजूस असलेल्या स्मशानभूमी रस्त्यालगत पोलिसांनी अचानक छापा टाकला. या ठिकाणी महिलांना पैशांचे आमिष दाखवून आणि आर्थिक फायद्यासाठी त्यांना आश्रय देऊन, त्यांच्याकडून सक्तीने वेश्याव्यवसाय करून घेतला जात असल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणी चोपडा शहर पोलिस स्टेशन येथे 11 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात शिल्पा राजू लामा (वय 35, रा. चोपडा) सह पूजा टीकाराम थापा (वय 29, रा. चोपडा) या दोघींना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून शिवाजी भिमराव पाटील (रा. चोपडा), फरीद कबीर शेख (रा. चोपडा), शाहबद वाहिद खान (रा. चोपडा), शरिफ सत्तार तडवी (रा. चोपडा), बाबू उर्फ जितेंद्र बाबूराव वाघे (रा. चोपडा), फिरोजी हंसा खान (रा. चोपडा), बाबू उर्फ जितेंद्र श्रावण वाघे (रा. चोपडा), संदीप उर्फ सोनू लक्ष्मण पाटील (रा. चोपडा), सुरेंद्र राजपूत (रा. चोपडा) हे 9 जण घटनास्थळावरून फरार झाले आहे. या कारवाईदरम्यान पोलिसांनी ज्या 6 महिलांची सुटका केली, त्या प्रामुख्याने राजस्थान आणि नेपाळ येथील रहिवासी असल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. या पीडित महिलांना सुरक्षित स्थानी हलवण्यात आले असून त्यांना कायदेशीर संरक्षण आणि आवश्यक मदत पुरवण्याची प्रक्रिया सुरू आहे.
    पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पवन देसले यांनी ही कारवाई केली आहे. दरम्यान, चोपडा शहर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, मानवी तस्करी, वेश्याव्यवसाय अथवा महिलांच्या शोषणासंदर्भात कोणतीही माहिती मिळाल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, अशा गुन्ह्यांविरुद्ध कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    यावल–रावेर बसमधून सोन्याच्या दोन वाट्या चोरीला

    September 7, 2026

    यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा महापूर; प्रशासन गप्प का?

    September 7, 2026

    भयंकर! विषारी दारूमुळे ९ जणांचा दुर्दैवी मृत्यू

    September 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif