Monday, August 15, 2022

केंद्रातील भाजप सरकारचा पारोळ्यात महागाई विरोधात महागाई मुक्त आंदोलन

- Advertisement -

लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

पारोळा;  केंद्रात गेल्या २०१४ सालापासून भारतीय जनता पार्टी चे सरकार आल्यापासून महागाई दिवसेंदिवस वाढत आहे २०१४ साली सर्वसामान्याचा स्वयंपाक घरातील गॅस ३९० वरुन आज रोजी एक हजार पार झाला असुन ६० रुपयात मिळणारे पेट्रोल आज १२० रुपया पर्यंत पोहोचला आहे.

- Advertisement -

- Advertisement -

यामुळे महागाई वाढली असुन  सामान्य नागरीक शेतकरी यांना महागाईची झळ बसत असुन बेसुमार वाढत जाणारी महागाईमुळे सर्वसामान्य नागरीकांचे जिवन जगणे मुश्कील झाले आहे  केंद्रातील मोदी सरकार दिवसागणीक महागाई वाढवत आहे  जनतेची जाण न असणारे केंद्रातील भाजप सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो.

येणाऱ्या काळात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष महागाई मुक्त भारत ही संकल्पना राबविणार आहे महागाई विरोधात केंद्रातील सरकारचा  भाव वाढीचा  भारतीय राष्ट्रीय  तालुका काँग्रेस कमिटीचा वतीने जाहीर निषेध करतो.अशा आशयाचे निवेदन पारोळा तहसीलदार अनिल गवांदे यांना आज देण्यात आले यावेळी तालुका अध्यक्ष  पिरनकुमार अनुष्ठान,

बाळासाहेब पाटील, रामराव राजाराम पाटील,उमेश बापुराव पाटील , नामदेव भिका महाजन, अभय हिम्मत निकम, रामचंद्र सहादु निकम, श्याम प्रभाकर चौधरी,लोटन रमेश पाटील ,भरत दौलत पाटील आदी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या