प्रा. डॉ. प्रदीप तळवलकर तुम्ही सुद्धा..!

0

लोकशाही विशेष

जळगाव शहरातील नामांकित शिक्षण संस्था ला. ना. हायस्कूल मधील क्रीडा शिक्षक डॉ. प्रदीप तळवलकर यांची विद्यार्थ्याप्रती क्रीडा शिक्षक म्हणून ओळख निर्माण झालेली आहे. त्यांनी त्यांच्या क्रीडा शिक्षक पेशाच्या कारकिर्दीत अनेक तरुण खेळाडू निर्माण केले. त्यांनी अनेक क्रीडा विषयक उपक्रम राबवले. क्रीडा क्षेत्रातील शिक्षणामुळे संशोधन वृत्ती, अभ्यासाचा व्यासंग फार कमी असताना सुद्धा तुम्ही क्रीडा क्षेत्रात संशोधन करून पीएचडी हा किताब मिळवला. त्यासाठी विद्यापीठाने तुम्हाला डॉक्टरेट पदवी बहाल केली.

आपली तीस-पस्तीस वर्षाची क्रीडा क्षेत्रातील कारकीर्द नावाजलेली असताना, अनेक पुरस्कार आपल्याकडे आपोआप चालून आले असते. त्यासाठी काही कुरापत्या अथवा चुकीच्या गोष्टी करण्याची गरज नव्हती. त्याच बरोबर तुमच्या क्रीडा क्षेत्रातील कारकीर्दविषयी अनेक जण कौतुक करीत असताना जनतेची ही पावती पुरेशी असती. क्रीडा क्षेत्रातील श्री छत्रपती क्रीडा संघटक हा पुरस्कार मिळालाच पाहिजे, याची आवश्यकता नव्हती. परंतु हा श्री छत्रपती क्रीडा संघटक पुरस्कार मिळवण्यासाठी तुम्हाला जे गुन्हेगारी कृत्य करावे लागले ते फार मोठे लांच्छन तुम्हाला लागले आहे. त्यासाठी तुमचा शिक्षकी पेशा बदनाम झाला. तुमच्या कारकिर्दीत घडलेल्या अनेक विद्यार्थी आज तुमच्या गुन्हेगारी कृत्यामुळे बिचारी हळहळत असतील.

हा पुरस्कार मिळवण्यासाठी जे गुन्हेगारी कृत्य तुमच्या हातून घडले त्यावर तुमच्या विद्यार्थ्यांचा प्रथमदर्शनी विश्वासच बसला नसेल. परंतु तुमची क्रीडा क्षेत्रातील कारकीर्द एवढी गाजलेली असताना तुम्हाला या पुरस्काराचा मोह का आवरला नाही? याचे वाईट वाटते. 2018 साली तुम्हाला श्री छत्रपती क्रीडा संघटक पुरस्कार विधिवत मिळाला, तेव्हा तुमच्या हजारो विद्यार्थ्यांना जो आनंद झाला तो गगनात मावेनासा होता. तथापि चार वर्षानंतर तुम्ही गुन्हेगारी कृत्य करून हा पुरस्कार मिळाल्याबद्दल तुमच्यावर न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. या वृत्ताने अगदी तुमच्या हजारो विद्यार्थ्यांना शरमेने मान खाली घालावी लागली.

मोठ्या अभिमानाने अथवा ताठ मानने आपल्या गुरुंविषयी तुमचे विद्यार्थी तुमचा आदर्श सांगत होते. त्या आदर्श आदर्शाचा जणू चुराडा झाला. सदरचा पुरस्कार मिळवण्यासाठी जे खोटे आणि बनावट प्रमाणपत्र तुम्ही सादर केले ते केवळ अन केवळ तुमचा त्याचा मोह का आवरला नाही? असा प्रश्न तुमच्या सर्व विद्यार्थ्यांच्या मनात आज घोंगावत असणार एवढे मात्र निश्चित. आणि “गुरुवर्य तळवलकर सर तुम्ही सुद्धा..?” असा प्रश्न त्यांना सतावत असेल.

तुम्ही घडवलेल्या विद्यार्थ्यांचे प्रेम तुमच्या पाठीशी असताना तुम्ही हे गुन्हेगारी कृत्य का केले ? आता तुमच्याविषयी जे गोडवे गायले तुमचा आदर्श विषयी अनेकांजवळ आम्ही बोललो, या आदर्शवर पाणी फिरले, असे म्हणावे का? तरीसुद्धा तुमच्याविषयी हे वृत्त चुकीचेच असावे असे आम्हाला वाटते. त्यावर विश्वास बसत नाही, असेच तुमच्या विद्यार्थ्यांना वाटत असेल. परंतु न्यायालयाकडून आलेले हे वृत्त आल्यामुळे त्यावर विश्वास ठेवणे क्रमाप्राप्त आहे.
ला. ना. हायस्कूलमधील क्रीडा शिक्षक डॉक्टर प्रदीप तळवलकर यांनी आपल्याला क्रीडा क्षेत्रातील श्री छत्रपती क्रीडा संघटक पुरस्कार मिळवण्यासाठी केलेले अनेक खोटे व बनावट प्रमाणपत्र हे शिक्षके पेशाला लांच्छन आहे, असेच म्हणावे लागेल. जोपर्यंत हे गुन्हेगारी कृत्य न्यायालयाकडून उघडकीस आले नव्हते, तोपर्यंत डॉक्टर प्रदीप तळवलकर असे कृत्य करतील असा विश्वास बसत नव्हता. परंतु एका चुकीच्या कृत्यामुळे अनेक चुकीच्या गोष्टी कराव्या लागल्या, असे म्हणतात. तसेच तळवलकरांच्या हातून घडले एवढे मात्र निश्चित. त्यामुळे ज्या शाळेत ते क्रीडा शिक्षक होते त्या शाळेची ही त्यांच्या या कृत्यामुळे फसवणूक झाली आहे.

त्यांच्या या गुन्हेगारी कृत्यामुळे त्यांना मिळालेल्या पीएचडी या पदवी विषयी सुद्धा आता अनेक तर्क वितरकांना उधाण आले आहे. त्यांच्या या पदवी विषयी सुद्धा संशय निर्माण होणे साहजिक आहे. आपली कारकीर्द सोनेरी पानावर लिहिण्यासारखी असतानाही एक चूक त्यांना भोवली, असेच म्हणावे लागेल. अर्थात त्यांनी हे का केले असावे? या प्रश्नाचे उत्तर मात्र सापडत नाही. परंतु शिक्षक शिक्षण क्षेत्रासारख्या पवित्र क्षेत्रात ही घटना घडल्याने शिक्षण क्षेत्र मात्र त्यामुळे बदनाम होते आहे एवढे मात्र निश्चित.

डॉक्टर तळवळकर यांनी केलेले कारनामे स्पर्धकामुळे उघडकीस आले हे मात्र खरे आहे. 2018 साली जेव्हा डॉक्टर तळवळकरांना हा श्री छत्रपती संघटक पुरस्कार मिळाला तेव्हा क्रीडा क्षेत्रात कार्य करणारे स्पर्धक होते, त्यांना हा पुरस्कार मिळणे अपेक्षित होते. त्यांना हा पुरस्कार मिळणार अशी चर्चाही त्यावेळी झाली होती. परंतु त्यांना न मिळता डॉक्टर तळवळकरांना पुरस्कार मिळाला. परंतु संबंधित स्पर्धकांनी या बाबींचा पर्दाफाश केला. चार वर्षे त्यांनी संघर्ष केला आणि हे खोटे व बनावट प्रमाणपत्र सादर केल्याचे कोर्टाद्वारे सिद्ध केले. संबंधित स्पर्धकाला पुरस्कार मिळाला नाही त्यांची शहानिशा करण्याची गरज नाही. तथापि त्यांनी जो लढा दिला आणि खोटे कृत्य उघडकीस आणून परदा फाश केला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले पाहिजे. कारण शिक्षण क्षेत्रात अशा प्रकारचे कुकृत्य करण्यास कुणी धजावणार नाही..!

Leave A Reply

Your email address will not be published.