चंद्रपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क
संत रविदास महाराज यांचा जयंतीनिमित्त शहरात भव्य शोभायात्रा चर्मकार सेवा समितीच्या वतिने सर्व एकत्र येऊन शहरात अंचलेश्वर गेट परीसरात संत रविदांसाचा प्रतिमेस पूजन करून ढोल तासाच्या गजरात रथावर प्रतिमा ठेवून शोभायात्रेला सुरूवात झाली.
या प्रसंगी शोभायात्रेचे स्वागत करुन संत रविदास महाराज यांचा प्रतिमेस अभिवादन करून महाप्रसाद सुरुवात केली. समाजबांधवांनी महाप्रसाद चा लाभ घेतलाय, शोभायात्रा आनंदित उत्साहात पार पडल्याने चर्मकार सेवा समिती तर्फे आयोजकांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.
यावेळी शोभायात्रेचे यशस्वी नियोजन रितेश उर्फ आदि पिंपळकर यांचा मार्गदर्शनात वसंता चांदेकर, प्रकाश पिंपळकर, अजय अहेरवार, बबलु अहेरवार, पवन करमरकर, यश चव्हाण, अमोल हांडे, विक्कि चांदेकर, संतोष पिंपळकर, रवि पिंपळकर, धनराज सावरकर, सोनु गिरडकर, संकेत हांडे, विनोद अहेरवार, समेत अहेरवार, वासुदेव नांदुरकर यांनी केले.