प्रा. श्याम साळुंखे यांना शैक्षणिक क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल राष्ट्रीय स्तरावरील उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार

0

शेंदुर्णी, ता.जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क

धी .शेंदुर्णी सेकं.एज्युकेशन को-ऑप. सोसायटीचे अप्पासाहेब र. भा. गरुड कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील उप प्राचार्य आणि वाणिज्य विभागप्रमुख प्राध्यापक डॉ. श्याम जीवन साळुंखे यांना त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीकरीता मुंबई विद्यापीठाशी संलग्नीत, मुंबई विद्यापीठाचा उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार प्राप्त यासह प्राईड ऑफ महाराष्ट्र अवॉर्ड, प्राईड ऑफ मुंबई अवॉर्ड, इंडिया एसएमई एक्सलेन्स अवॉर्ड, न्याक अ दर्जा प्राप्त आणि आणि आयएसओ मनांकित ठाकूर एजयुकेशनल ट्रस्टचे ठाकूर कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स, मुंबई महाविद्यालयाच्या शैक्षणिक कामगिरी तथा वाटचालीच्या रौप्य महोत्सवनिमित्त ठाकूर एज्युकेशनल ट्रस्टचा ठाकूर अवॉर्ड फॉर एक्सलन्स अवॉर्ड अंतर्गत राष्ट्रीय पातळीवरील “द एक्सलेंट टीचर अवॉर्ड” (उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार) मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू मा. प्रा. डॉ. सुहासजी पेडणेकर यांच्या हस्ते आणि कुलसचिव प्रा. डॉ. सुधीरजी पुराणिक, ठाकूर एजयुकेशनल ट्रस्टचे सेक्रेटरी मा. श्री. ठाकूर जितेंद्रसिंग, ट्रस्टी मा. श्री. ठाकूर रमेशसिंग आणि ठाकूर महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. चैताली चक्रवर्ती यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथील पंचतारांकित हॉटेल “द ललित” येथे ठाकूर एज्युकेशनल ट्रस्टच्या ठाकूर कॉलेज ऑफ सायन्स आणि कॉमर्स यांच्यावतीने आणि ठाकूर रामनारायण कॉलेज ऑफ आर्टस् आणि कॉमर्स, ठाकूर रामनारायण कॉलेज ऑफ लॉ आणि ठाकूर रामनारायण पब्लिक स्कूल, मुंबई यांच्या सहयोगाने आयोजित भव्यदिव्य सत्कार समारोहात प्रदान करण्यात आला.

डॉ. श्याम साळुंखे हे सदर पुरस्कार मिळविणारे राष्ट्रीय पातळीवरील पाच शिक्षकांपैकी एक तर कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगांव परिक्षेत्रातील एकमेव प्राध्यापक असून ते कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव चे वाणिज्य आणि व्यवस्थापन शास्त्र विद्याशाखेअंतर्गत अकौंटन्सी अँड कॉस्टिंग अभ्यासमंडळ, अमळनेर च्या प्रताप (स्वायत्त) महाविद्यालयाचे कॉम्प्युटिंग मॅनेजमेंट अभ्यासमंडळ, संगमनेर येथील मालपाणी (स्वायत्त) महाविद्यालयाचे मॅनेजमेंट अँड कॉस्ट अकौंटिंग अभ्यासमंडळाचे सदस्य आहेत, महाविद्यालय पातळीवर आयक्यूएसी समन्वयक म्हणून महाविद्यालयाचे न्याक पुनर्मूल्यांकनात महाविद्यालयाचा दर्जा बी वरून बी प्लसवर नेण्यात मोलाचे योगदान होते.

महाविद्यालयीन गुणवत्ता जोपासण्यासाठी महाविद्यालयाचे शैक्षणिक आणि प्रशासकीय अंकेक्षणात सतत अ दर्जा, महाविद्यालयाचे आयएसओ मनांकन यामध्येही महत्वपूर्ण कामगिरी बजावली आहे, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात निःस्वार्थ भावनेने सेवा दिल्याबद्दल यापूर्वी मुगू इंटरनॅशनल फौंडेशन, हिमाचल प्रदेश चा राष्ट्रीय ई-इनोव्हेशन अवॉर्ड, ह्यूमन राईट्स अँड सोशल जस्टीस या संस्थेचा हुम्यानीटरियन एक्सलेन्स अवॉर्ड, मरिना रिसर्च अँड डेव्हलपमेंट लॅब, चेन्नईचा डॉ. ए. पी. जे. अवॉर्ड फॉर टिचिंग एक्सलेन्स, प्रतापीयन्स प्रेरणा प्रबोधिनी, अमळनेर चा प्रतापीयन्स प्रेरणा पुरस्कार, प्रताप महाविद्यालय अमळनेर चा कॉमर्स अँड मॅनेजमेंट सन्मान, इ. पुरस्कारांनी गौरविले गेले आहेत.

डॉ. साळुंखे यांच्या नावे 17 पुस्तके, 50 पेक्षा अधिक शोधनिबंध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय शोधपत्रिकेत प्रकाशित आहेत, विद्यार्थ्यांना रोजगार संधी उपलब्ध व्हावी याकरिता उद्योग पुरस्कृत आणि कौशल्याधारित अभ्यासक्रम वाणिज्य विभागात राबविणे, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात मार्गदर्शक आणि अध्यक्ष म्हणून सहभाग, संशोधन मार्गदर्शक, यासह अनाथ विद्यार्थ्यांना मदत, इ. कार्यामध्ये सहभाग यासर्व शैक्षणिक कामकाजाची पावती म्हणून उत्कृष्ट शिक्षक या पुरस्काराने गौरविण्यात आले.

प्रा. श्याम साळुंखे यांच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे यात विशेषतः धी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑप. सोसायटीचे चेअरमन दादासाहेब श्री संजयजी गरुड, सचिव दाजीसाहेब श्री सतिशजी काशिद, सहसचिव भाऊसाहेब श्री दिपकजी गरुड, जेष्ठ संचालक श्री सागरमलजी जैन, श्री. यु. यु. पाटील, महिला संचालिका ताईसाहेब सौ. उज्वलाताई काशिद, संस्थेचे सर्व पदाधिकारी यासह महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वासुदेव रमेश पाटील, प्राध्यापकवृंद, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि आजी माजी विद्यार्थी यासर्वांकडून अभिनंदन होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.