काँग्रेसच्या आंदोलना दरम्यान पोलिसांनी प्रियांका गांधींना फरफटत नेलं… (व्हिडीओ)

0

 

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क;

दिल्लीत काँग्रेसच्या मुख्यालयाबाहेर आंदोलन करणाऱ्या प्रियांका गांधी यांना पोलिसांनी ओढत, फरफटत ताब्यात घेतलं आहे. काँग्रेसकडून पोलीस बळाचा वापर करून आंदोलन दडपण्याचा आरोप केला आहे. काँग्रेस कडून आज ठिकठिकाणी महागाई, बेरोजगारी विरोधात आंदोलनात करण्यात येत आहे या दरम्यान प्रियांका गांधी यांना ताब्यात घेतांना झालेली फरफट व्हिडीओ मध्ये दिसत आहे. आंदोलनात काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींपासून खासदार राहुल गांधी, काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधींपर्यंत सर्वच नेते रस्त्यावर उतरले आहेत.

काँग्रेस महागाई आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावर आक्रमक झाली आहे. देशभरात ठिकठिकाणी काँग्रेसचे कार्यकर्तेही रस्त्यावर उतरलेले आहेत. महाराष्ट्रातही मुंबईसह प्रत्येक जिल्ह्यात काँग्रेसचे कार्यकर्ते आंदोलन करत आहेत. अशातच काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा यांच्यावरील पोलीस कारवाईनंतर काँग्रेसकडून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.

दरम्यान, विरोधी पक्षांना पाठिंबा देणाऱ्यांच्या मागे ईडी आणि सीबीआय लावली जाते. त्यामुळे विरोधकांचा प्रभाव दिसून येत नाही. केंद्र सरकारविरोधात जेवढं मी बोलेन तेवढी माझ्यावर कारवाई केली जाईल. पण मी कारवाईला घाबरत नाही. जो धमकावतो तोच घाबरतो. हे लोक २४ तास खोटं बोलण्याचे काम करतात. त्यांना महागाई आणि बेरोजगारीसोबत दिलेल्या आश्वसानाचीही भीती वाटत असल्याची टीका राहूल गांधी यांनी केली.

आंदोलन करणाऱ्या काँग्रेस नेत्यांवर पोलिसांनी महाराष्ट्रातही कारवाई केली आहे. नाना पटोलेंचे हातपाय पकडून पोलीस व्हॅनमध्ये टाकण्यात आलं. काँग्रेसने ट्वीट करत याबाबत माहिती दिली.

 

पंजाबमध्येही आंदोलन तीव्र स्वरुपात बघायला मिळाले

या दरम्यान पोलिसांनी पाण्याच्या टँकरचा देखील वापर केला.

Leave A Reply

Your email address will not be published.