पृथ्वी शॉ च्या अडचणीत वाढ

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

पृथ्वी शॉ यावर सेल्फी घेण्यासाठी काही जणांनी बळजबरी केल्याची घटना थोड्या दिवसांपूर्वी घडली. आणि तेथून बाद अजून चिघळत जात आहे. टीम इंडियाचा क्रिकेटपटू पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) च्या अडचणीत आणखी भर पडणार आहे. मॉडेल, भोजपुरी अभिनेत्री सपना गिलच्या (Sapna Gill) अटकेमुळे पृथ्वी शॉ ला मिळालेला दिलासा क्षणिक ठरला आहे. न्यायालयाने सपना गिलला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्याचवेळी तिने पृथ्वी शॉ विरोधात विनयभंगाचा तक्रार नोंदवली आहे. त्यामुळे पृथ्वीच्या अडचणीत आणखी भर पडणार आहे. पृथ्वी विरोधात कलम 34, 120 ब (गुन्हेगारी कारस्थान), 146, 148, 149, 323, 324, 351, 354 (विनयभंग) आणि कलम 509 अंतर्गत तक्रार दाखल केली आहे.

पृथ्वी शॉ वर हल्ल्याचा प्रयत्न, शिवीगाळ आणि कार तोडफोड प्रकरणी सपना गिलला 17 फेब्रुवारीला मुंबई पोलिसांनी अटक केली. हा सर्व प्रकार 15 फेब्रुवारीला घडला होता. सपना गिल आणि तिच्या मित्रांसोबत दुसऱ्यांदा सेल्फी घेण्यास नकार दिला, म्हणून त्यांनी आपल्यावर हल्ला केला, असा आरोप पृथ्वी शॉ ने केला आहे. मित्रांसमवेत मी हॉटेलमध्ये डीनर करत होतो, असं पृथ्वी शॉ ने पोलिसांना सांगितलं.

Leave A Reply

Your email address will not be published.