Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • पारडी येथे “आदिवासी सल्ला शक्ती स्थापना दिन” उत्साहात
    • भुसावळच्या प्रभारी नगराध्यक्ष शैलजा नारखेडे यांचे अभिनंदन!
    • खालसा हेल्प फाउंडेशनची कार्यकारिणी जाहीर
    • पुढील 3 दिवसात विक्रमी तापमानाची नोंद होणार
    • आरटीआय कार्यकर्त्याची भरदिवसा ठेचून हत्या
    • लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात
    • तीन लहान मुलांनी आरोपीला रोखण्याचा केला होता प्रयत्न
    • सूर्यनारायण कोपला.. काळजी घ्या..!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»राष्ट्रीय»ब्रिक्स परिषदेतून पंतप्रधान मोदींचे चीनवर वार!
    राष्ट्रीय

    ब्रिक्स परिषदेतून पंतप्रधान मोदींचे चीनवर वार!

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJuly 8, 2025No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    रिओ दि जानेरो : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रिक्स समूहाच्या वार्षिक शिखर परिषदेत सदस्य राष्ट्रांना महत्वपूर्ण खनिजे आणि तंत्रज्ञानाची पुरवठा साखळी सुरक्षित करण्यासाठी एकत्र काम करण्याचे आवाहन केले आहे. या संसाधनांचा वापर कोणत्याही देशाने स्वार्थी हेतूसाठी किंवा इतरांविरुद्ध शस्त्र म्हणून करू नये, असेही मोदींनी सांगितले आहे.
    बहुपक्षीयता, वित्तीय व्यवहार आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या मुद्द्यांवर आयोजित सत्रांमध्ये बोलताना मोदी यांनी एआयच्या वापरासाठी जागतिक स्तरावर नियम बनवण्याची गरज अधोरेखित केली आहे, जेणेकरून गैरवापर रोख लावता येईल. महत्वपूर्ण खनिजांवर चीनने लादलेल्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर मोदींची ही टिप्पणी महत्त्वाची मानली जात आहे. चीनच्या धोरणांबद्दल जागतिक स्तरावर चिंता व्यक्त होत आहे. पंतप्रधान मोदींनी ब्रिक्स राष्ट्रांना सहकार्याचे आवाहन केले आहे, जे चीनसाठी एक अप्रत्यक्ष इशारा मानला जात आहे. चीनच्या वाणिज्य मंत्रालयाने एप्रिल महिन्यात निर्यात नियंत्रण आदेश जारी केला होता. परिणामी दुर्मिळ पृथ्वी धातू आणि संबंधित उत्पादनांच्या जागतिक पुरवठ्यात कमतरता निर्माण झाली असताना पंतप्रधान मोदींचे हे विधान समोर आले आहे.
    जगातील जवळपास 90-95 टक्के दुर्मिळ पृथ्वी धातू प्रक्रिया क्षमता चीनमध्ये आहे. त्यामुळे चीन निर्यातीचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी करू शकतो. दुर्मिळ पृथ्वी धातू आणि त्यांच्या उत्पादनांचा वापर अक्षय्य ऊर्जा, स्वच्छ ऊर्जा आणि इलेक्ट्रॉनिक्स यांसारख्या क्षेत्रांमध्ये केला जातो. लिथियम, निकेल आणि ग्रेफाइट यांसारख्या खनिजांना इलेक्ट्रिक वाहने, ड्रोन आणि बॅटरी साठवणुकीसाठी यासोबतच उच्च दर्जाच्या तंत्रज्ञान उत्पादनांसाठी महत्वाचा स्त्रोत मानले जाते. जागतिक स्तरावर महत्वपूर्ण खनिजांच्या पुरवठा साखळीत चीनची प्रमुख भूमिका आहे.

    भारतात होणार एआय इम्पॅक्ट समिट
    पंतप्रधान मोदींनी घोषित केले की, भारत पुढील वर्षी ‘एआय इम्पॅक्ट समिट’ आयोजित करणार आहे. मोदी पुढे म्हणाले, ‘आमचा असा विश्वास आहे की एआय प्रशासनात चिंता दूर करणे आणि नवोपक्रमाला प्रोत्साहन देणे याला समान महत्त्व दिले पाहिजे. जबाबदार एआयसाठी आपण एकत्र काम केले पाहिजे. ते म्हणाले की डिजिटल कंटेंटची सत्यता पडताळून पाहता येईल असे जागतिक मानके तयार केली पाहिजेत, जेणेकरून आपण कंटेंटचा स्रोत ओळखू शकू आणि पारदर्शकता राखू शकू आणि गैरवापर रोखू शकू.

    प्रमुख अर्थव्यवस्थांची एकजूट
    जगातील 11 प्रमुख उदयोन्मुख अर्थव्यवस्थांना एकत्र आणून ब्रिक्स हा एक प्रभावशाली समूह म्हणून उदयास आला. जो जागतिक लोकसंख्येच्या सुमारे 49.5 टक्के, जागतिक जीडीपीच्या सुमारे 40 टक्के आणि जागतिक व्यापाराच्या सुमारे 26 टयांचे प्रतिनिधित्व करतो. पंतप्रधानांनी आपल्या भाषणात ‘ग्लोबल साउथ’ला मदत करण्यासाठी ब्रिक्स करत असलेल्या प्रयत्नांवरही प्रकाश टाकला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    भाजप कार्यालय फोडलं : १५-२० हल्लेखोरांचा हल्ला!

    May 12, 2026

    ७१७ सरकारी दारूची दुकाने तातडीने बंद करा!

    May 12, 2026

    बंगालच्या उपसागरात कमी दाबाची प्रणाली सक्रिय

    May 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif