Sunday, November 27, 2022

धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर जाणून घ्या सोने चांदीचा भाव…

- Advertisement -

 

- Advertisement -

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

- Advertisement -

- Advertisement -

दिवाळी म्हटली की घरात एक आनंदाचे वातावरण दरवळू लागतं, त्यानिमित्ताने खरेदीसाठी बाजारपेठा अगदी गच्च भरून जातात. त्यामुळे बाजारात सर्वत्र तेजी असते. या दिवशी सोनं खरेदीला विशेष महत्त्व आहे. अशा परिस्थितीत जर तुम्ही आज सोने आणि चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या अगदी आधी सोन्या-चांदीच्या किमतीत घसरण झाली आहे. ही दिवाळीत होत असलेली दरातली घसरण ग्राहकांसाठी दिलासादायक आहे. त्यामुळे आज धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोने खरीदाचा ग्राहकांना चांगला लाभ घेता येणार आहे.

सध्या 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 46,070 रुपयांपर्यंत आहे. तो यापूर्वी 46,300 रुपयांपर्यंत इतका होता. तर सध्या 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 50850 इतका आहे. तो याआधी 50,600 रुपये इतका होता. दरम्यान, दुसरीकडे चांदी मात्र महागली आहे. सध्या चांदीचा प्रति किलोचा दर 58,500/ रुपये इतका आहे.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या