“राष्ट्रपती निवडणूक” अशी असते निवडणुकीची प्रक्रिया…

0

 

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क;

विद्यमान राष्ट्रपती माननीय श्री.रामनाथ कोविंद यांनी 25 जुलै 2017 साली भारताच्या 14 व्या राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली होती. आता 24 जुलै 2022 रोजी त्यांचा कार्यकाळ समाप्त होत आहे. त्यामुळे नवीन राष्ट्रपती निवडणे क्रमप्राप्त आहे. त्यासाठी १८ जुलै ला मतदानही झाले. राष्ट्रपती हे भारताचे सर्वोच्च संविधानिक पद आहे. २९ जून पर्यंत नामांकन, १८ जुलै प्रत्यक्ष निवडणूक, तर आज 21 जुलै रोजी निकाल जाहीर होईल.

राष्ट्रपतीपदासाठी उमेदवारांची पात्रता.

सर्वप्रथम तो भारताचा नागरिक असावा. 35 वर्षे वय पूर्ण असावे. राज्य वा केंद्र सरकारच्या अखत्यारीतील कोणतेही लाभाचे पद स्वीकारलेले नसावे. लोकसभेच्या 50 खासदारांनी प्रस्तावक आणि 50 खासदारांनी अनुमोदक म्हणून मान्यता मिळवली पाहिजे. रूपये 15000/- अनामत रक्कम म्हणून भरलेली पाहिजे.

राष्ट्रपती निवडणूकीत यांना असतो मतदानाचा अधिकार.

राष्ट्रपती पदासाठी लोकसभेचे व राज्यसभेचे खासदार मतदान करतात पण त्यातील “2 ॲंग्लो इंडियन नियुक्त लोकसभा व 12 राष्ट्रपती नियुक्त राज्यसभेतील खासदारांना मतदानाचा अधिकार नसतो.” म्हणून लोकसभेचे 543 व राज्यसभेचे 233 असे मिळून 776 खासदार मतदान करतात.

त्याचबरोबर प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात असलेले विधानसभेच्या आमदारांनाही मतदानाचा हक्क आहे. विधानपरिषदेच्या आमदारांना राष्ट्रपती निवडणूकीत मतदानाचा हक्क नाही. महाराष्ट्र राज्याचे विधानसभेचे 288 आमदार मतदार करू शकतात. असेच आपल्या संपूर्ण देशातील राज्ये व केंद्रशासित प्रदेशातील फक्त विधानसभेच्या आमदारांची संख्या 4120 आहे.

प्रत्येक मताला असणारे मूल्य जाणून घेऊया.

“प्रत्येक राज्याच्या विधानसभेतील आमदारांच्या मताला वेगवेगळे वेटेज आहे. हे वेटेज त्या राज्यांची लोकसंख्या आणि विधानसभेच्या आमदारांची संख्या किती आहे त्याच्यावर अवलंबून आहे. लोकसंख्या जास्त वेटेज जास्त लोकसंख्या कमी वेटेज कमी.” हे गुणोत्तर काढण्यासाठी 1971 ची जनगणना आधारभूत धरलेली आहे ती 2026 पर्यंत चालणार आहे. त्यानंतर सर्वानुमते त्यात बदल होईलच.

हाराष्ट्र विधानसभा आमदारांचे मताचे मूल्य (वेटेज)

राज्यातल्या आमदारांचं वेटेज किती आहे हे ठरवण्यासाठी त्या त्या राज्यांची लोकसंख्या एकूण आमदारांच्या संख्येनं भागली जाते. अशा प्रकारे प्राप्त झालेल्या संख्येला नंतर परत 1000 नं भागलं जातं. त्यातून जो आकडा उत्तर म्हणून येतो तो त्या राज्यातील आमदाराच्या मताचं वेजेट असतं. यासाठी 1971 ची जगगणना आधार मानली जाते. आता हेच गणितीय सूत्र वापरून आपण मतांचे मूल्य पाहू.

1971 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या 50400000 (पाच कोटी चार लाख होती) म्हणजेच 5 कोटी चार लाख भागिले 288 त्यातून येणाऱ्या संख्येला 1000 ने भागल्यानंतर 175 आकडा येतो. म्हणजेच महाराष्ट्रातल्या प्रत्येक आमदारांच्या मतांचं मूल्य हे 175 आहे.

50400000÷288=175000 तसेच पुढे

175000÷1000=175 हे झाले प्रत्येक मतांचे मूल्य,

175 मूल्य ×288 आमदार= 50400 हे महाराष्ट्रातील विधानसभेच्या आमदारांचे एकूण मूल्य (वेटेज)

याच सुत्रानुसार संपूर्ण भारतातील राज्ये व केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा आमदारांचे मत मूल्य काढले जाते.

काही राज्यांतील आमदारांचे मत मूल्य.

उत्तर प्रदेश – 208,केरळ – 152,मध्य प्रदेश – 131

कर्नाटक – 131,पंजाब – 116,बिहार – 173

गुजरात – 147,झारखंड – 176,ओडिशा – 149 या मूल्याप्रमाणे संपूर्ण भारतात असलेल्या 4120 विधानसभेच्या आमदारांचे मत मूल्य 549474 आहे

लोकसभा व राज्यसभा खासदारांचे मत मूल्य

हे मूल्य काढण्यासाठी संपूर्ण देशातील विधानसभेच्या आमदारांचे एकूण मूल्य भागीले लोकसभा व राज्यसभेतील एकूण मतदानास पात्र खासदार. एकूण आमदारांचे मूल्य 549474÷776 खासदार=708 हे प्रत्येक खासदारांचे मत मूल्य आहे.

खासदारांचे एकूण मत मूल्य

776 खासदार × 708 प्रत्येकाचे मतमूल्य = 549404 खासदारांचे एकूण मतमूल्य

सर्व विधानसभेचे आमदार व सर्व खासदार यांच्या मतांचे एकूण मूल्य.

549474+549408=10,98882 एकूण मूल्य

राष्ट्रपती निवडणूक जिंकण्यासाठी 50% मतांची आवश्यकता असते त्याप्रमाणे ही निवडणूक जिंकण्यासाठी 5.49442 (पाच लाख एकूणपन्नास हजार चारशे बेचाळीस) मते आवश्यक आहेत.

या निवडणुकीस 3 उमेदवार उभे राहू शकतात. बॅलेट पेपरवर A…B…C असे पर्याय असून कोणत्याही उमेदवाराला अग्रक्रमाने (Preference)  मतदान करता येते. आजपर्यंत श्री.निलम संजीव रेड्डी हे एकमेव राष्ट्रपती बिनविरोध निवडले गेले व डॉ.राजेंद्र प्रसाद हे 2 वेळा राष्ट्रपती म्हणून निवडून आले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.