Sunday, November 27, 2022

राष्ट्रपतिपद: शिवसेना द्रौपदी मुर्मूंना देणार पाठिंबा; राऊतांचे संकेत

- Advertisement -

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

शिवसेनेतून (Shivsena) शिंदे गटाने (Shinde Group) बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेला लागोपाठ धक्के बसले. त्यातच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shiv Sena chief Uddhav Thackeray) यांच्यासमोर उभे राहिले आहे.

- Advertisement -

- Advertisement -

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत (Presidential Election 2022) भाजपाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू ( Draupadi Murmu ) यांना पाठिंबा देण्याचा आग्रह धरत शिवसेना खासदारांनी उद्धव ठाकरेंची कोंडी केली आहे, त्यामुळे पक्षात पुन्हा फूट पडू नये म्हणून उद्धव ठाकरे हे द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याची घोषणा करतील, अशी शक्यता आहे.

शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना तसे संकेत दिले आहेत. अनेक खासदारांनी द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याबाबत मत मांडलं आहे. मात्र मुर्मू यांना पाठिंबा देणं, म्हणजे भाजपाला पाठिंबा दिला, असं होत नाही, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला आहे.

संजय राऊत म्हणाले की, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी देशात वेगवेगळे मतप्रवाह आहेत. उद्धव ठाकरे यांनी याबाबत खासदारांचा कल जाणून घेतला. महाराष्ट्रातही आदिवासी समाज मोठ्या प्रमाणावर आहे. शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते आदिवासी क्षेत्रात काम करत आहेत. काल झालेल्या बैठकीला आमशा पाडवी, निर्मला गावित उपस्थित होते. यासंदर्भात अंतिम निर्णय काय घ्यायचा तो उद्धव ठाकरे यांनी घ्यावा असे निश्चित झाले आहे, असे राऊत यांनी सांगितले.

 

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या