Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दिल्लीतील इमारत कोसळली; किती विद्यार्थी दबले गेले?
    • यावल–रावेर बसमधून सोन्याच्या दोन वाट्या चोरीला
    • यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा महापूर; प्रशासन गप्प का?
    • भुसावळ राष्ट्रवादीचे ११ नगरसेवक शिवसेनेत; सावकारे गटात अस्वस्थता!
    • बापरे! मुख्य वीज उपकेंद्रात भीषण स्फोटाने खळबळ!
    • दिल्लीत 5 मजली इमारत कोसळली
    • महाराष्ट्रातील ‘या’ भागांमध्ये पावसाचा इशारा
    • नव्या टीमनंतर केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना वेग
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»राजकारण»नीट आंदोलनानंतर नव्या जनआंदोलनाची तयारी
    राजकारण

    नीट आंदोलनानंतर नव्या जनआंदोलनाची तयारी

    4 ऑगस्ट रोजी सरकारविरोधात दिल्लीत मोर्चा
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveAugust 3, 2026No Comments266 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    दिल्लीतील जंतर-मंतर येथे झालेल्या नीट परीक्षेतील कथित प्रश्नपत्रिका फुटीविरोधातील आंदोलनाची देशभरात मोठी चर्चा झाली. देशाच्या कानाकोपऱ्यातून विद्यार्थी दिल्लीत दाखल झाले आणि या आंदोलनाला व्यापक प्रतिसाद मिळाला. आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला. त्यामुळे मोदी सरकारमधील हा पहिला राजीनामा ठरला. या आंदोलनाचे नेतृत्व अभिजीत दिपके यांनी केले होते. तसेच, सरकारने कॉकरोच जनता पार्टीच्या बहुतांश मागण्या मान्य केल्याचे सांगितले जात आहे.

    या आंदोलनाला मिळालेल्या प्रतिसादानंतर आता आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही सरकारविरोधात जनआंदोलन उभारण्याचा निर्णय घेतला आहे. E-20 इंधनाचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी केंद्र सरकारविरोधात मोर्चा उघडला असून, ही त्यांची राजकीय रणनीती असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

    केजरीवाल यांनी E-20 इंधन धोरणावर टीका करत केंद्र सरकारला लक्ष्य केले आहे. त्यांनी या मुद्द्याविरोधात दोन लाखांहून अधिक नागरिकांनी ऑनलाइन याचिकेवर स्वाक्षऱ्या केल्याचा दावा केला आहे. तसेच, 4 ऑगस्ट रोजी 100 समर्थकांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी मोर्चा काढणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे.

    या आंदोलनात सहभागी होणाऱ्यांनी लाठीमार किंवा तुरुंगवासाची भीती न बाळगता सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. केजरीवाल यांची ही घोषणा अशा वेळी आली आहे, जेव्हा नीट परीक्षेच्या कथित प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी जंतर-मंतरवरील आंदोलनामुळे संपूर्ण देशाचे लक्ष या विषयाकडे वेधले गेले आहे. त्या आंदोलनानंतर आता आम आदमी पक्षाने E-20 इंधनाचा मुद्दा पुढे करत सरकारविरोधातील भूमिका अधिक आक्रमक केली आहे.

    मात्र, या आंदोलनात कॉकरोच जनता पार्टीचा उल्लेख टाळण्यात आल्याची चर्चा आहे. या मागे त्या आंदोलनाचे श्रेय दुसऱ्या पक्षाकडे जाऊ नये, अशी राजकीय भूमिका असल्याचे बोलले जात आहे. ज्या प्रकारे कॉकरोच जनता पार्टीला जनसमर्थन मिळाले, त्याचप्रमाणे आपल्यालाही व्यापक पाठिंबा मिळेल, अशी अपेक्षा आम आदमी पक्षाला असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. देशाचे लक्ष वेधून घेण्यासाठी आणि सरकारवर दबाव वाढवण्यासाठीच पंतप्रधानांच्या निवासस्थानी मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही मानले जात आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    दिल्लीत 5 मजली इमारत कोसळली

    September 6, 2026

    नव्या टीमनंतर केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना वेग

    September 6, 2026

    भयंकर! विषारी दारूमुळे ९ जणांचा दुर्दैवी मृत्यू

    September 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif