हृदयद्रावक; चक्कर येऊन पडल्याने गर्भवतीचा जुळ्या बाळांसह मृत्यू…

0

 

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क:

नाशिकमधील (Nashik) पाथर्डी फाटा परिसरात एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे.(A very heartbreaking incident happened) घरात काम करताना अचानक चक्कर आल्याने गर्भवर्ती महिलेसह जुळ्या बाळांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. पूजा देवेंद्र मोराणकर (४५) असे मृत गर्भवती महिलेचं नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी पूजा आपल्या पाथर्डी येथील घरी काम करत होत्या. घरातील कामे आवरण्यासाठी त्या बाथरूममध्ये गेल्या. बाथरूममधून बाहेर आल्यानंतर त्यांना अचानक भोवळ आली. कुटुंबीयांना काही कळण्याच्या आत त्या जमीनीवर कोसळल्या. दरम्यान, यावेळी घरात पूजा यांचे वडील रमेश चिंतामण पाखले आणि बहीण होती. त्यांनी पूजाच्या दिशेने धाव घेतली. त्यानंतर बेशुद्ध अवस्थेत असलेल्या पूजाला त्यांनी पाथर्डी येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दरम्यान, पूजा ह्या रुग्णालयाच्या पायऱ्या चढत असताना त्यांना पुन्हा भोवळ आली आणि त्या जागीच कोसळल्या. यावेळी पूजा यांच्यासह त्यांच्या गर्भातील जुळ्या बाळांचा मृत्यू झाला.

या घटनेने मोराणकर आणि पाखले कुटुंबीयावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे पूजा यांच्या कुटुंबात तब्बल २१ वर्षांनी पाळणा हलणार होता. मात्र, एका क्षणातच होत्याचे नव्हते झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here