संविधान दिनानिमित्त राष्ट्रवादीतर्फे संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन…

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी महानगर(जिल्हा)तर्फे आकाशवाणी येथील कार्यालयात आज दि. २६ नोव्हेंबर रोजी  दुपारी १२ वाजता संविधान दिनाचे औचित्य साधुन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतीमेला माल्यार्पण करून संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. तसेच २६/११रोजी मुंबई हल्लातील शहिदांच्या प्रतिमेला हार अर्पन करून शहिदांना श्रद्धांजली अर्पन करण्यात आली.

यावेळी महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी, जिल्हा सरचिटणीस अशोक पाटील, सेवादल जिल्हाअध्यक्ष वाय.एस महाजन, महानगर सरचिटणीस सुनिल माळी, सामाजिक न्याय विभाग जिल्हाउपाघ्यक्ष रमेश बहारे, सामाजिक न्याय विभाग जिल्हाउपाघ्यक्ष अशोक सोनवणे, महानगर जिल्हा उपाध्यक्ष किरण राजपुत, जितेन्द्र बागरे, जयप्रकाश चांगरे, राहुल टोके, प्रविण सुरवाडे, कार्यालय मंत्री सतीष चव्हाण ई.मान्यवर ऊपस्थीत होते.

Leave A Reply

Your email address will not be published.