Monday, September 26, 2022

महाभारतात भिमाची भूमिका साकारणारे प्रवीण कुमार यांचं निधन

- Advertisement -

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

- Advertisement -

सर्वात जास्त गाजलेल्या बी. आर. चोप्रा यांच्या महाभारत मालिकेत भीम ही भूमिका साकारणाऱ्या प्रवीण कुमार सोबती यांचं निधन झालं आहे. महाभारत या मालिकेमुळे ते घराघरात पोहचले होते. गेल्या अनेक दिवसांपासून ते पाठदुखीच्या आजाराने त्रस्त होते.

- Advertisement -

- Advertisement -

काही महिन्यांपूर्वी त्यांच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली आहे. त्यानंतर चालणं-फिरणंही कठीण झालं होतं. वयाच्या 74 व्या वर्षी त्यांचा मृत्यू हार्ट अटॅकमुळे झाला. प्रवीण कुमार हे पंजाबच्या तरणतारणचे मूळ रहिवासी होते. प्रवीण कुमार यांची एकुलती एक मुलगी निपुणका यांनी ही माहिती दिली आहे. हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्यांचं निधन झालं आहे.

प्रवीण कुमार सोबती यांनी 30 पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनय क्षेत्रामध्ये पदार्पण करण्याआधी ते हॅमर आणि डिस्कस थ्रो एथलीट होते. एशियन गेम्समध्ये त्यांनी दोन गोल्ड मेडल पटकावले होते. तसेच त्यांनी दोन सिल्व्हर आणि एक ब्रॉन्झ मेडल देखील त्यंनी पटकावले होते. त्यांनी 1968 मधील मॅक्सिको ऑलिम्पिक्स आणि 1972 मधील म्यूनिख ऑलिम्पिक्समध्ये भारताचे प्रतिनिधित्व केलं. तसेच ते बीएसएफचे जवान देखील होते.

प्रवीण कुमार सोबती यांनी अमिताभ बच्चन, जितेंद्र अशा अनेक सुपरस्टारसोबत काम केले आहे. १९८१ साली प्रदर्शित झालेल्या ‘रक्षा’ या चित्रपटातून त्यांनी अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली होती. त्यानंतर प्रदर्शित झालेल्या ‘मेरी आवज सुनो’मध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती.

प्रवीण हे एक अभिनेता होतेच त्यासोबतच एक अॅथलीट होते. त्यांनी आशिया खेळांमध्ये २ सुवर्ण, १ रौप्य आणि १ कांस्य पदक जिंकले होते. तसेच ऑलिम्पिक स्पर्धेत त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले होते.

९० च्या दशकात ‘महाभारत’ ही दूरदर्शनची मालिका खूप गाजली होती. या मालिकेत भीमचे पात्र अभिनेते ‘प्रवीण कुमार सोबती’ यांनी साकारले होते. बी आर चोप्रा भीमच्या भूमिकेसाठी ऑडिशन घेत असल्याचे प्रवीण कुमार यांना समजले होते. तेव्हा ऑडिशन देण्यासाठी ते तिथे पोहोचताच भरभक्कम शरीरयष्टी पाहून त्यांचे सिलेक्शन करण्यात आले. भीमची भूमिका गाजवल्यानंतर प्रवीण कुमार सोबती यांनी अनेक हिंदी चित्रपटातून काम केले होते. ​प्रविणकुमार सोबती यांनी एशियायी थाळी फेक स्पर्धेत १९६६ आणि १९७० साली सुवर्ण पदक पटकावले होते. तर १९७४ साली रजतपद​​क मिळवले तर १९६६ साली हॅमर थ्रो स्पर्धेत कांस्यपदक पटकावले होते. एवढे असूनही आज सरकार त्यांच्याकडे लक्ष्य देत नाही अशी एक खंत त्यांनी व्यक्त केली होती.

एशियन गेम्समध्ये जेवढ्या खेळाडूंनी मेडल्स मिळवली होती त्या सर्वांना पेन्शन दिली जाते. मात्र माझ्याबाबत कोणीच काही विचारपूस करत नाही. सगळ्यात जास्त गोल्ड मेडल्स मी मिळवून दिली होती, मी एकमेव एथलीट प्लेअर होतो ज्याने कॉमनवेल्थ गेम्समध्ये रिप्रेझेंट केलं होतं. तरी देखील मला हा वाईट अनुभव मिळाला. प्रविणकुमार सोबती हे बीएसएफ मध्ये डेप्युटी कमांडेंट म्हणून कार्यरत होते. त्यामुळे सध्या बीएसएफ कडून त्यांना पेन्शन मिळत आहे. मात्र ही मदत खूपच तुटपुंजी असल्याचे त्यांचे म्हणणे होते. डिसेंबर महिन्यात त्यांनी ही खंत व्यक्त केली होती.

 

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या