कर्म हेच आत्म्याच्या प्रगती अधोगतीचे कारण

0

 

प्रवचन सारांश 17 109/2022

 

आत्म्याच्या उन्नतीला व प्रगतीला व्यक्तीचे स्वतःचे कर्म कारणीभूत ठरत असतात. कर्म दुष्परिणाम टाळण्यासाठी धर्म करावा असे आवाहन आजच्या प्रवचनात पू. जयेंद्र मुनी यांनी केले.

‘उठ उठ रे जिवड़ो, प्रभू रो  भजन करो…’ या भजनात उत्तम संदेश देण्यात आला आहे. जीव, आत्म्याला प्रगती पासून रोखणारा महत्त्वाचा खरा घटक कर्म असतो. संसारी जीवाला कर्म करण्या आधी हजार वेळा विचार करायला हवा असे सांगण्यात आले आहे. तुम्हाला सुख हवे असेल तर पुण्य करा, धर्म करा असे सांगण्यात आले आहे. दुःखा पासून बचाव करायचा असेल तर पाप करू नका, कर्मास कापण्याचे सामर्थ्य केवळ धर्मात आहे. असा मोलाचा संदेश डॉ. पदमचंद्र मुनी यांचे सुशिष्य जयेंद्र मुनी यांनी आजच्या प्रवचनातून दिला.

सूर्यास्त होण्या आधी सूर्य प्रकाश देतो, फुल सुकण्या आधी सुगंध देत असतो तसेच आपले जीवन पूर्ण होण्या आधी सत्कार्य करावे. कर्म गती बद्दल एक रूपक कथा त्यांनी सांगितली. एका गावात एक शेठ असतात. त्यांना मुलगा मुलगी असतात. शेठजींची पत्नी मृत्युमुखी पडते. वडील मोठ्या स्नेहाने  आपल्या दोन्ही मुलांना वाढवतात.  आईचाही स्नेह ते देतात परंतु कालांतराने त्यांचेही निधन होते.  भाऊ-बहिणीचे अफाट प्रेम असते. बहिण विवाह योग्य होते रितीरिवाजानुसार भाऊ आपल्या बहिणीचा विवाह करतो. जावयाला भरपूर धन दौलत देतो. त्यानंतर भाऊ देखील स्वतःचे लग्न करतो. कर्माचे फेरे काही वेगळेच असतात. केव्हा प्रतिकूलता व केव्हा अनुकुलता येऊन जाईल हे कुणीही सांगू शकत नाही. जीवनात काहीही घडू शकते.त्याच्या व्यवसायात तोटा आला, होते नव्हते ते सर्व त्यात गेले. आर्थिक परिस्थिती वाईट झाली, शेवटी मजुरी करून त्याला उदरनिर्वाह करावा लागत होता.  गृहस्थ जीवनात पैसा तर अनिवार्य असतो. आकर्षक, आवश्यक व अनिवार्य असे ३ गरचेचे प्रकार प्रकार समजावून सांगण्यात आले.  परिस्थितीला कंटाळू एके दिवशी शेठच्या मुलाच्या पत्नीने सल्ला दिला. हिम्मत हरू नये.  तसे ज्ञानीजन पण सांगून गेले. पत्नीने हिंमत दिली. शेठचा मुलगा एकटा धन कमावण्यासाठी विदेशी निघाला. जात असताना बहिणीचे गाव लागते. बहिणीकडे पोहोचला. अत्यंत गरीब, फाटके कपडे असलेला भाऊ पाहून आपल्याला सासरचे मंडळी हसतील म्हणून तिने भावाची ओळखही नाही दिली. आमच्या घरी काम करणारा आहे त्यामुळे मला बहिण म्हणतो त्याची व्यवस्था घोड्याच्या पाग्यात केली जाते. त्याला भोजन देखील शिळे पाकळे दिले जाते. पाठची बहीण आपल्या परिस्थितीमुळे असे वागते हे त्याला समजते व तेथून तो निघून जातो. जिथे अवमान होते तेथे थांबू नये म्हणून तो भाऊ तेथून लगेच पुढे निघून जातो. खूप मेहनत करतो, धन कमावतो व पुन्हा आपल्या घरी परत येतो. वाटेत बहिणीचे गाव असते. यावेळी तो मात्र बहिणीकडे न जाता बागेत थांबतो व नोकराला बहिणीकडे पाठवून भाऊ स्वतः आल्याचे कळवतो. भरपूर धन घेऊन आलेल्या भावाचे स्वागत करण्यासाठी स्वतः बहिणी भावाकडे पोहोचते. महालात मुक्काम कर त्यावर भाऊ म्हणतो मला घोड्यांच्या पागेत रहायचे आहे. बहिणीने आणलेले पंच पक्वान्न तो आपल्या सोबत आणलेल्या जड, जवाहीर, दागिन्यांना भरवतो. भाऊ असे का करत आहे असे बहिणीने विचारले त्यावेळी भावाने आठवण करून दिले की मी गरीब होतो त्यावेळी तू मला घोड्याच्या पाग्यात ठेवले व शिळे पाकळे अन्न दिले. परंतु आता मी धनीक झालो असल्याने हे अन्न मला नव्हे तर माझ्या धनाला बघून दिले आहे. बहिणीला आपली चूक समजते. कर्म मुळे सुख, दुःख कसे निर्माण होतात हे उदाहरण त्यांनी या रुपक कथेच्या माध्यमातून पटवून दिले. जय गच्छाधिपती 12 वे पट्‌टधर आचार्य श्री पूज्य पार्श्वचंद्रजी म.सा., अनुप्पेहा ध्यान प्रणेता डॉ. पदमचंद्र मुनी आदिठाणा ७ यांच्या पवित्र सान्निध्यात चातुर्मास कार्यक्रम आहे त्यात प्रवचन माला सुरू आहे.

 

———□■□■ ————

पू. डॉ. पदमचंद्रजी मुनी यांचे सुशिष्य पू. जयधुरंधर मुनी यांचे जळगावात प्रवचन सुरु असून किशोर कुलकर्णी यांनी शब्दांकन केलेली त्यांची मेरी भावनाही प्रवचन मालिका दै. लोकशाही ~ लोकलाईव्हवर प्रसिद्ध करीत आहोत. रोजचं नवीन प्रवचन जरूर वाचा फक्त लोकशाही वर

Leave A Reply

Your email address will not be published.