Saturday, October 1, 2022

मोठी बातमी.. प्रताप सरनाईकांची 11 कोटींची मालमत्ता ED कडून जप्त

- Advertisement -

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

- Advertisement -

शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्यावर मोठी कारवाई केली आहे. पीएमएलए अॅक्ट अंतर्गत त्यांची  NSEL घोटाळा प्रकरणात (NSEL fraud case) 11.35 कोटींची मालमत्ता जप्त केली आहे.

- Advertisement -

- Advertisement -

ईडीने ठाण्यातील सरनाईक यांच्या दोन फ्लॅट आणि मालमत्ता पीएमएलए अॅक्ट अंतर्गत जप्त केली, असून याची किंमत 11.35 कोटी आहे. आतापर्यंत शिवसेनेच्या चार नेत्यांना ईडी चौकशीसाठी समन्स बजावण्यात आलं. यामध्ये मंत्री अनिल परब, आनंदराव अडसूळ, प्रताप सरनाईक आणि खासदार भावना गवळींच्या समावेश आहे.

मागील काही दिवसांपासून वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये शिवसेनेच्या नेत्यांवर ईडीकडून कारवाई सुरु आहे. यामध्ये नेत्यांचे नातेवाईक, त्यांच्याशी संबंधीत कंपन्या आणि इतर मालमत्तांची चौकशी केली जातेय. ईडीने २२ मार्च रोजी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नातेवाईकावर कारवाई केली आहे. ईडीने ठाकरेंच्या मेहुण्याची ६ कोटींपेक्षा अधिक किंमतीची मालमत्ता जप्त केली आहे. पुष्पक बुलियन प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. ‘नीलांबरी’ प्रकल्पातील ११ सदनिका हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या मालकीच्या आहेत. श्रीधर पाटणकर हे रश्मी ठाकरेंचे भाऊ आणि उद्धव ठाकरेंचे मेहुणे आहेत. यापूर्वी मनी लाँडरींगप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच मालमत्तेवर ईडीने कारवाई झाली आहे. त्यानंतर आता सरनाईक यांच्या मालमत्ता देखील जप्त करण्यात आल्या आहेत.

ठाणे महानगरपालिकेने अनधिकृत बांधकामाचा ठपका ठेवत प्रताप सरनाईक यांच्या कंपनीला तीन कोटी 33 लाख दंड ठोठावला होता. यापैकी या कंपनीने 25 लाखांची रक्कम महापालिकेकडे जमा करण्यात आली होती. उर्वरित तीन कोटी आठ लाखांची रक्कम व त्यावरील 18 टक्के दराने व्याजाची एक कोटी 25 लाखांची रक्कम सरनाईक यांच्याकडून बाकी होती. मात्र एकूण 21 कोटी रक्कम होत असल्याचा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केलाय.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या