अ.भा. मराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी प्रशांत दामले…

0

 

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

१६ एप्रिल रोजी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक पार पडली होती. त्यानंतर अ.भा. मराठी नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाच्या कार्यकारी समिती २०२३-२०२८ ची निवडणूक मंगळवारी झाली. या निवडणुकीत प्रशांत दामले यांची अध्यक्षपदी निवड झाली. तसेच उपाध्यक्षपदी (प्रशासन) नरेश गडेकर यांची, उपाध्यक्षपदी (उपक्रम) भाऊसाहेब भोईर यांची बिनविरोध निवड झाली, तर कोषाध्यक्षपदी सतीश लोटके यांची निवड झाली.

अ.भा. मराठी नाट्य परिषदेच्या कार्यकारी समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत कार्यवाहकपदी अजित भुरे यांची निवड झाली असून सहकार्यवाहपदी समीर इंदुलकर, दिलीप कोरके आणि सुनील ढगे यांची निवड झाली आहे. अनेक चढ-उतार या निवडणूक प्रक्रीये दरम्यान आल्याने या निवडणुकीला विशेष महत्व प्राप्त झाले होते. मात्र आता या कार्यकारणी निवडीनंतर सर्व चर्चांवर पडदा पडला असे म्हणता येईल.

Leave A Reply

Your email address will not be published.