Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • कुस्तीपटू अश्विनी पौळ यांची मुलांसह आत्महत्या
    • आमदारांच्या उपस्थितीत भाजप महिला आघाडीचे रक्षाबंधन
    • स्व डॉ. चारुदत्त साने यांच्या जयंतीनिमित्त रविवारी मोफत रोगनिदान शिबीराचे आयोजन
    • हल्ल्यानंतर विद्यानंद बापटांनी स्पष्ट केली मोठी भूमिका
    • उज्बेकिस्तानमधून सांगण्यापेक्षा देशात पत्रकार परिषद घ्या!
    • विमानाची पार्किंगदरम्यान खांबाला जोरदार धडक
    • बी.एन. अग्रवाल कन्स्ट्रक्शनचे निकृष्ठ काम चव्हाट्यावर!
    • अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार; त्या नराधम शिक्षकास अद्दल घडवा!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»ताज्या बातम्या»एकनाथ खडसेंच्या जावयावरील कलंक फॉरेन्सिकने पुसला!
    ताज्या बातम्या

    एकनाथ खडसेंच्या जावयावरील कलंक फॉरेन्सिकने पुसला!

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveOctober 1, 2025No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    एकनाथ खडसेंच्या जावयावरील कलंक फॉरेन्सिकने पुसला!
    अंमली पदार्थांचे सेवन केलेच नाही : फॉरेन्सिक चाचणी अहवाल प्राप्त
    पुणे I लोकशाही न्यूज नेटवर्क
    राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांच्या खराडी ड्रग्स पार्टी प्रकरणात सत्य समोर आले आहे. प्रांजल खेवलकर आणि इतर आरोपींनी अंमली पदार्थांचे सेवन केले नसल्याचा फॉरेन्सिकचा रिपोर्ट पोलिसांना प्राप्त झाला असल्याची माहिती समोर आली आहे. प्रांजल खेवलकर आणि इतर आरोपींची ड्रग्स पार्टी प्रकरणात फॉरेन्सिक चाचणी करण्यात आली होती. त्याचे रिपोर्ट पोलिसांना प्राप्त झाले आहेत. या प्रकरणात एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर तब्बल दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ जेलमध्ये होते. प्रांजल खेवलकर यांची येरवडा जेलमधून सुटका झाली आहे.

    पुण्यातील खराडी परिसरात कथित ड्रग्ज पार्टी प्रकरणी प्रांजल खेवलकर यांना दि. 25 सप्टेंबर रोजी जामीन मंजूर करण्यात आला आहे. प्रांजल खेवलकर हे रोहिणी खडसे यांचे पती आणि एकनात खडसे यांचे जावई आहेत. दीड महिन्यांपेक्षा अधिक वेळ प्रांजल खेवलकर तुरुंगात होते. त्यामुळे त्यांना मिळालेला जामीन मोठा दिलासा होता. खेवलकर यांच्यासह इतर आरोपींना देखील जामीन मंजूर करण्यात आला होता.

    पुण्यातील खराडी भागातील एका पार्टीवर पोलिसांनी छापा टाकला होता. त्या पार्टीत अंमली पदार्थ पोलिसांनी जप्त केले होते. त्या पार्टीत काही महिला देखील होत्या. त्या पार्टीमध्ये काही प्रमाणात अंमली पदार्थ देखील आढळले होते. अंमली पदार्थाचे सेवन प्रांजल खेवलकर यांनी केले हा कळीचा मुद्दा होता. त्याच मुद्यावर त्यांना जामीन मिळालेला होता. दीड महिन्यांहून अधिक काळ तुरुंगात राहिल्यानंतर पुणे सत्र न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. दरम्यान प्रांजल खेवलकर आणि इतर आरोपींनी अंमली पदार्थांचे सेवन केले नसल्याचा फॉरेन्सिकचा रिपोर्ट पोलिसांना प्राप्त झाला असल्याची माहिती समोर आली आहे.

    पुण्यातील खराडी भागात सुरु असलेल्या एका खोलीतील पार्टीवर पोलिसांनी दि. 27 जुलै रोजी छापा टाकला होता. त्या कारवाईदरम्यान प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर प्रांजल खेवलकरांसह इतर आरोपींना पुणे सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आलेला आहे. प्रांजल खेवलकर सहभागी असलेल्या पुण्यातील पार्टीत अंमली पदार्थ सापडल्याने त्यांना अटक करण्यात आली होती. पुणे पोलिसांनी दि. 27 जुलै रोजी छापा टाकून प्रांजल खेवलकर आणि इतर सात जणांना अटक केली होती. पोलिसांनी खराडीतील त्या खोलीत 25 जुलै रोजी देखील पार्टी झाल्याचा दावा केला होता.

    राजकारणामुळे प्रकरणाची जोरदार चर्चा
    प्रांजल खेवलकर हे एकनाथ खडसे यांचे जावई आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांचे पती असल्याने या प्रकरणाची राज्यभरात चर्चा झाली होती. यामुळे राजकीय वातावरण देखील मोठ्या प्रमाणावर तापल्याचे पाहायला मिळाले होते, त्यानंतर प्रांजल खेवलकर यांच्या संदर्भात बीडच्या एका स्वयंसेवी संस्थेच्यावतीने राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी प्रांजल खेवलकर यांच्यावर आरोप केले होते.

    #crime pranjal khewalkar
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    स्व डॉ. चारुदत्त साने यांच्या जयंतीनिमित्त रविवारी मोफत रोगनिदान शिबीराचे आयोजन

    September 4, 2026

    बी.एन. अग्रवाल कन्स्ट्रक्शनचे निकृष्ठ काम चव्हाट्यावर!

    September 4, 2026

    यावलच्या सोनाली तायडे यांचा बेस्ट बिझनेस अँड ब्युटी आर्टिस्ट अवॉर्डने सन्मान

    September 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif