Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • सीजीपीच्या तिरंगा यात्रेने लक्ष वेधले!
    • अखेर बिबट्या वनविभागाच्या पिंजऱ्यात कैद; शेतकऱ्यांची दहशतीतून सुटका!
    • आदिवासी लोक संघर्ष मोर्चाला किती ताण देणार?
    • दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी तुटपुंज्या मदतीत!
    • एका धडकेत सहा जीव संपले; तीन चिमुकल्यांचाही दुर्दैवी अंत!
    • मसाल्यांतील भेसळीविरुद्ध राज्यभर कठोर कारवाईचे आदेश!
    • पाचोऱ्यात हातमजुराचा आर्थिक विवंचनेतुन गळफास
    • अदानी-अंबानींचे २० लाख कोटी रुपयांचे कर्जमाफी मग..
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»ताज्या बातम्या»‘तमाशा’ म्हणणाऱ्या प्राणिती शिंदेचा मोदींनी घेतला समाचार
    ताज्या बातम्या

    ‘तमाशा’ म्हणणाऱ्या प्राणिती शिंदेचा मोदींनी घेतला समाचार

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJuly 31, 2025No Comments2 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली : संसदेत सोमवारपासून पहलगाम हल्ला आणि ‘ऑपरेशन सिंदूर’बाबत चर्चा सुरू आहे, त्या चर्चेत सहभागी झालेल्या सोलापूरच्या काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी ‘ऑपरेशन सिंदूर हे नाव ऐकून तर देशभक्तीचे वाटते. पण सरकारने माध्यमांमध्ये केलेला तो एक तमाशा होता,’ असे विधान केले होते. या विधानावरून सभागृहात एकच गोंधळ सुरू झाला. या घमासान नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात प्रणिती शिंदेसह काँग्रेसचा चांगलाच समाचार घेतला.
    खासदार प्रणिती शिंदे यांनी ऑपरेशन सिंदूरला ‘तमाशा’ असे संबोधलं आणि केंद्र सरकारवर अनेक प्रश्न उपस्थित केले. ‘ऑपरेशन सिंदूर हा सरकारचा केवळ मीडियासाठी तमाशा होता. यात किती दहशतवादी मारले गेले? किती लढाऊ विमाने गमावली? कोण जबाबदार आहे? याचे उत्तर सरकारने द्यावे अशी मागणी प्रणिती शिंदे यांनी संसदेत केली.
    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्राणिती शिंदे यांच्या वादग्रस्त वक्तव्याला प्रत्युत्तर देताना म्हटले, काँग्रेसच्या एक नवख्या खासदार (प्राणिती शिंदे) त्यांना आपण माफ केले पाहिजे; कारण नवख्या खासदारास काय म्हणायचे? पण काँग्रेसचे आका त्यांना लिहून देतात, त्यांच्याकडून वदवून घेतात. कारण, काँग्रेसच्या आकामध्ये हिम्मत नाही.
    नवख्या सदस्यांकडून काँग्रेसचे आका वदवून घेतात की, ऑपेरशन सिंदूर हा तर तमाशा होता. पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी ज्या 26 लोकांना मारले, त्या भयंकर घटनेवर ॲसिड टाकण्यासारखे हे पाप आहे. या ऑपरेशनला तुम्ही तमाशा म्हणता? तुमची असहमती असू शकते. पण, काँग्रेस पक्षाचे लोक असे वदवून घेतात, असा आरोपही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस पक्षावर केला.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    अखेर बिबट्या वनविभागाच्या पिंजऱ्यात कैद; शेतकऱ्यांची दहशतीतून सुटका!

    October 16, 2026

    मेट्रो-रेल्वे सेवा बंद ठेवल्याने सर्वोच्च न्यायालय नाराज

    October 15, 2026

    अपहरणाचा संशय : विमानाचे आपत्कालीन लँडिंग

    October 14, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif