प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेंतर्गत सिंचनासाठी ९० % अनुदान उपलब्ध

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

कृषि विभागाच्या प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना प्रति थेंब अधिक पिक सुक्ष्म सिंचन योजने अंतर्गत त्यांचे नावावर असलेल्या शेत गटक्रमांक सर्वेनंबर मधील प्रक्षेत्रावर पेरणी केलेल्या पिकास पाणी देण्यासाठी ठिबक आणि तुषार सिंचन संच बसविल्यास कृषि विभाग महाराष्ट्र शासन यांचे अंतर्गत अनुसुचित जाती व अनुसुचित जमाती लाभार्थींना ४५/ ५५ टक्के व जिल्हा परिषद कृषि विभाग डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना / बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना क्षेत्रातंर्गत व क्षेत्रा बाहेरील योजना २०२१-२२ अंतर्गत ३५/ ४५ टक्के पुरक अनुदान देण्यात येते.

त्यानुसार अनुसुचित जाती व अनुसुचित जमाती लाभार्थांनी महाडीबीटी प्रणालीवर जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी अर्ज करुन प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना प्रति थंब अधिक पिक योजने अंतर्गत त्यांचे नावावर असलेल्या शेतजमीनीच्या प्रक्षेत्रावर पिकास पाणी देण्यासाठी मोठया प्रमाणावर ठिबक / तुषर सिंचन संच बसवुन शासनाने ठरवुन दिलेल्या पिकातील अंतर व ठरवुन दिलेल्या आर्थिक मापदंडाच्या रक्कमेनुसार एकुण ९० टक्के अनुदानाचा लाभ घेण्यात यावा.

सविस्तर माहितीसाठी संबधित तालुक्याचे तालुका कृषि अधिकारी कार्यालयात संपर्क करावा, असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकुर यांनी केले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.