प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्राचे थाटात उद्घाटन

0

अमरावती, लोकशाही न्यूज नेटवर्क 

केंद्रिय रसायन आणि खते मंत्रालयांतर्गत खते विभागाचे प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्राचे (Pradhan Mantri Kisan Samriddhi Kendra) उद्घाटन थाटात संपन्न झाले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी केंद्र सरकारने ही योजना आखली असून त्याद्वारे शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे.

संपूर्ण भारतात ३,८४,००० कृषी केंद्रांपैकी पहिल्या चरणात केवळ ६०० किसान समृद्धी केंद्रांना परवानगी देण्यात आली असून त्यापैकी महाराष्ट्रात केवळ ५०- ६० केंद्रांचा समावेश आहे तर अमरावती जिल्ह्यात केवळ २ केंद्र असून ती दोनही केंद्रे आनंद परिवाराला मंजूर झाली आहे. अमरावती शहरात आनंद परिवार हे नाव सुविख्यात असून अतिशय प्रामाणिकपणे, सचोटीने व्यवसाय करणाऱ्यांपैकी अशी त्यांची ओळख आहे.

आनंद प्रमुख सुदर्शन गांग, अरुण कडू आणि प्रदिप जैन यांनी व्यवसायाला केवळ ग्राहक नसतो तर तो आनंद परिवाराचा सदस्य असतो. आनंद परिवाराने आपली सामाजिक परंपरा दीर्घकाळापासून जपली असून विविध सामाजिक कार्यात त्यांचा मोठा सहभाग असतो. भारतीय जैन संघटनेच्या माध्यामातून जलसंवर्धनासाठी केलेल्या कार्याची दखल संपूर्ण भारतात घेतली गेली हे येथे उल्लेखनीय आहे. अमरावती जिल्ह्यातील कुपोषणग्रस्त मेळघाटातील अनेक विद्यार्थ्यांना पुणे येथील वाघोली प्रकल्पात संपूर्ण शिक्षण व्यवस्था केली जाते. व आतापर्यंत शेकडो विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे.

कार्यक्रमाचे उद्घाटन भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रख्यात समाजसेवी सुदर्शन गांग (Social worker Sudarshan Gang), प्रदीप जैन, अरुणभाऊ कडू, जवाहरभाऊ गांग, जिल्हा कृषी अधीक्षक ए. एस. खर्चान, इंडियन पोटॅश लि. चे प्रबंधक एस. आर. पाटील, ठोसरे आदी उपस्थित होते. या शेतकरी मेळाव्याला मोठया संख्येत उपस्थिती होती. शेतकऱ्यांना प्रामाणिकपणे सेवा देणाऱ्या आनंद कृषी केंद्राच्या नव्या उपलब्धी बदल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन !

आनंद कृषी केंद्र, बडनेरा व कृषी आनंद अमरावती दोन्ही प्रतिष्ठानचे प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्राचे उद्घाटन थाटात संपन्न झाले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.