दै. लोकशाहीच्या ‘त्या’ वृत्ताची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा !

प्रदीप रायसोनींनी एन्ट्री घ्यावी : पदाधिकाऱ्यांची अपेक्षा

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

‘निवडणूक ‘चाणक्य’ प्रदीप रायसोनींची पुन्हा एन्ट्री?’ या मथळ्याखाली दै. लोकशाहीने आज दि. 24 जानेवारी रोजी ठळक वृत्त प्रकाशित केल्यानंतर त्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा झाली. माजी महापौर प्रदीप रायसोनी यांनी राजकारणात पुन्हा सक्रिय व्हावे अशी अपेक्षा पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या आहेत.

विविध निवडणुकांचे ‘चाणक्य’, महानगरपालिका प्रशासनावर पकड असलेले माजी महापौर प्रदीप रायसोनी हे पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय होणार असल्याचे वृत्त आज दि. 24 जानेवारी रोजी दै. लोकशाहीने प्रसिद्ध केल्यानंतर समाज माध्यमात त्याची सकाळपासूनच जोरदार चर्चा झाली. अनेक कार्यकर्त्यांनी सोशल मीडीयात भावना व्यक्त करीत प्रदीप रायसोनी यांनी पुन्हा राजकारणात सक्रिय होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ज्येष्ठ नेते सुरेशदादा जैन यांच्या मार्गदर्शनाखाली माजी महापौर प्रदीप रायसोनी यांनी शहरात विविध योजनांच्या माध्यमातून विकास केल्याने पुन्हा त्यांनी राजकारणात सक्रिय होणे गरजेचे आहे.

जळगाव शहर महानगरपालिकेसाठी येत्या एप्रिल महिन्यात निवडणूक होण्याची शक्यता असून त्यासाठी महायुतीने आतापासूनच हालचाली गतिमान केलेल्या आहेत. खान्देश विकास आघाडीच्या माध्यमातून प्रदीप रायसोनी यांनी महानगरपालिकेत 1985 ते 2007 या प्रदीर्घ काळात विविध जबाबदाऱ्या देखील निभावल्या आहेत. सद्यस्थितीत महापालिका सांभाळेल असे नेतृत्व नसल्याची चर्चा देखील असल्याने प्रदीप रायसोनी यांनी चाणक्याची भूमिका घेवून पुढे यावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. समाज माध्यमातील चर्चेत अजय बढे, अमित पाटील, अश्विन सोनवणे, नितीन सपके, कल्पिता पाटील, सुभाष सांखला, वसंत सुर्यवंशी यांनी सहभाग घेत प्रदीप रायसोनी यांनी सक्रिय होण्यावर आपले मत व्यक्त केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.